ताज्या घडामोडी :
Home » » येवल्यात गणपती मंदिराची दानपेटी ची चोरी

येवल्यात गणपती मंदिराची दानपेटी ची चोरी

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८ | बुधवार, सप्टेंबर १२, २०१८



येवल्यात गणपती मंदिराची दानपेटीची चोरी

येवला :- प्रतिनिधी

 श्री सिद्धी विनायक गणपती मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मध्यवस्तीत शहरातील मेनरोड वरील बाजार तळातील मंदिरात घडली.
साधारण साडेपाच फुट उंचीची पेटीवर एक फूट उंचीचा पितळी कळस असलेली लोखंडी दानपेटी ही साधारण ४ ते ५  जणांच्या चोरट्यांनी लंपास केली. दानपेटीचा कळस मंदिराच्या मागील बाजूस बाजारतळात तोडून टाकलेल्या अवस्थेत मिळुन आला आहे.
मध्यरात्री २ ते ३  वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे मंदिराचे ट्रस्टी यांनी माहिती दिली. सकाळी या बाबत माहिती घेऊन अधिक तपास सुरू असल्याचे शहर पोलिसांनी माहिती दिली. या चोरी मुळे भाविकांमध्ये नागरिकात प्रचंड रोष निर्माण झाला आहे लवकरात लवकर पोलिसांनी तपास लावण्याची मागणी भाविकांकडून होत आहे.

Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity