ताज्या घडामोडी :

.

.
Home » » अनैतिक संबंधातुन घडलेल्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा

अनैतिक संबंधातुन घडलेल्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ३ सप्टेंबर, २०१८ | सोमवार, सप्टेंबर ०३, २०१८


अनैतिक संबंधातुन घडलेल्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा

येवला - प्रतिनिधी

अनैतिक संबंधातुन येवला तालुक्यातील निमगाव मढ येथे घडलेल्या खुनाचा  स्थानिक गुन्हे शाखेने दोन दिवसातच तपास लावला आहे.   दि. ०१/०९/२०१८ रोजी येवला तालुका पोलीस ठाणे हद्यीत निमगाव मढ शिवारातील रस्त्याचे कडेला उसाचे शेतात एका अनोळखी महिलेचे पे्रत कुजलेल्या अवस्थेत मिळुन आले होते. मयत महिलेचा मृतदेह हा सुमारे १० ते १५ दिवसांपुर्वीचा कुजलेला असुन फक्त सांगाडाच शिल्लक राहिलेला होता, त्यामुळे महिलेची ओळख पटविणे पोलीसांपुढे आव्हान होते. घटनास्थळावर मयत महिलेचे अंगावर मिळुन आलेली साडी चीजवस्तुंची पडताळणी केली असता येवला शहर पोलीस ठाणेस मिसींग दाखल असलेबाबत माहिती मिळाली. त्यावरून मिसींग महिलेचे नातेवाईकांना संपर्क करून मृतदेह दाखविला असता मयत महिला ही सरला कृष्णा सोमासे, वय ४३, रा.पारेगाव, ता.येवला असे असल्याचे निष्पन्न झाले.

सदर बाबत येवला तालुका पोलीस ठाणेस तात्काळ आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत महिलेचे सांगाडयाचे फक्त अवशेष मिळुन आल्याने तिस मरण कसे आले याबाबत पोलीसांनी तपास सुरू केला, दरम्यान सदर आकस्मात मृत्युचे तपासात मयत महिलेस कोणीतरी अज्ञात आरोपीतांनी अज्ञात कारणावरून जिवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने प्रेत उसाचे शेतात फेकुन दिले असल्याचे निष्पन्न झाल्याने येवला तालुका पोलीस ठाणेस | गुरनं १५८/२०१८ भादवि कलम ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक संजय दराडे अपर पोलीस अधीक्षक  निलोत्पल यांनी सदर घटनेबाबत सविस्तर आढावा घेवुन अज्ञात मारेक-यांचा षोध घेणेसाठी केलेले मार्गदर्शन सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे त्यांचे पथकाने सदर गुन्हयाचा समांतर तपास सुरू केला. मयत महिला नामे सरला कृष्णा सोमासे ही गेल्या महिन्यात २२ तारखेपासुन मिसिंग असलेबाबत ची माहिती पुढे आली.  स्थागुशाचे पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी ती राहत असलेल्या पारेगाव शिवारात जावुन तिचे दैनंदिन कामकाज राहणीमानाबाबत सविस्तर माहिती घेतली. मयत महिलेचे येवला तालुक्यातील महालखेडा येथील दोन इसमांषी अनैतिक संबंध असल्याचे समजले, त्याप्रमाणे स्थागुशाचे पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी महालखेडा परिसरातुन इसम नामे ) निलेश भागवत गिते, वय २७, रा. महालखेडा, ता.येवला, ) अमोल दत्तु मोरे, वय २०, रा. महालखेडा, ता.येवला यांना संशयीत म्हणून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले इसम नामे निलेश गिते अमोल मोरे यांना तपासाचे कला कौशल्य वापरून चौकशी केली असता त्यांचे मयत महिला नामे सरला कृष्णा सोमासे हिचेशी अनैतिक संबंध असल्याचे तपासात
निष्पन्न झाले. संशयीत इसम नामे निलेश गिते अमोल मोरे हे दोघे मित्र असुन दोघेही विवाहीत आहे. मयत महिलेशी अनैतिक संबंध जुळल्यानंतर त्यांची तिचेशी जवळीक वाढली होती. दरम्यानचे काळात मयत महिला सरला सोमासे ही निलेश गिते अमोल मोरे यांचेकडे पैशाची मागणी करायला लागली, तसेच पैसे दिले नाही तर त्यांचे कुटूंबियांना सर्व प्रकार सांगेल अशी धमकी तिने दोघांना दिली. सदर प्रकाणाची वाच्यता झाल्यास समाजात बदनामी होईल दोघांचेही संसार उध्वस्त होतील त्यामुळे त्यांनी दोघांनी सरला सोमासे हिस कायमचे संपविण्याचा विचार पक्का केला तिला मारून टाकायाचे असे ठरविलेदरम्यान दिनांक २२ ऑगस्ट २०१८ रोजी महालखेडा गावात लक्ष्मीदेवीची यात्रा होती, तेथे
निलेश अमोल हे दोघेजण भेटले ठरल्याप्रमाणे निलेशने सरला सोमासे हिस फोन करून तुला पैसे द्यायचे आहे आम्ही तुला घ्यायला येतो असे सांगितले दोघेजण मोटरसायकलने पारेगाव शिवारात आले. सरला हिस रोडवर बोलावुन तिला कोणी ओळखु नये म्हणुन तोंडाला स्कार्फ बांधायला लावला तिघेही मोटरसायकलवर बसुन निमगाव रोडने निघाले. त्यानंतर दोन्ही संशयीतांनी निमगाव मढ गावचे शिवारात रोडचे कडेला मोटर सायकल थांबुवन सरला हिस बाजुस असलेले मकाचे शेतात बळजबरीने घेवुन गेले आजुबाजूस कोणीही नसल्याची संधी साधुन दोघांनीही तिला खाली पाडुन तिचे गळयातील स्कार्पने तिचा गळा आवळुन तिस जिवे ठार मारले असल्याची कबुली दिली आहे. तसेच सदर महिला ही मयत झाल्याची खात्री झाल्याने तिचा मृतदेह बाजुस असलेले उसाचे शेतात फेकुन देवुन तेथुन पसार झाले होते . स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी सदर गुन्हयात कोणताही पुरावा नसतांनाही अत्यंत चिकाटीने कौशल्यपुर्ण तपास करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्शक  संजय दराडे   मालेगावचे अपर पोलीस अधीक्शक
निलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्शक अशोक करपे
त्यांचे पथकातील सपोनि आशिष अडसुळ, पोउनि स्वप्निल नाईक, पोहवा शांताराम घुगे, पोना भरत
कांदळकर, प्रितम लोखंडे, पोकॉ किरण काकड, निलेश कातकाडे, इम्रान पटेल, प्रदिप बहिरम, हेमंत
गिलबिले, प्रदिप राठोड, संदिप लगड यांचे पथकाने सदर खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपीतांना ताब्यात घेतले आहे  


Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity