ताज्या घडामोडी :

.

.
Home » » अदयावत यंत्रसामग्रीने लक्षवेधी ठरले लासलगाव येथील कृषी प्रदर्शन बाभुळगावला कृषी महविद्यालयाचे येथे भव्य कृषी प्रदर्शन

अदयावत यंत्रसामग्रीने लक्षवेधी ठरले लासलगाव येथील कृषी प्रदर्शन बाभुळगावला कृषी महविद्यालयाचे येथे भव्य कृषी प्रदर्शन

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८ | बुधवार, सप्टेंबर २६, २०१८


 

 अदयावत यंत्रसामग्रीने लक्षवेधी ठरले लासलगाव येथील कृषी प्रदर्शन

बाभुळगावला कृषी महविद्यालयाचे येथे भव्य कृषी प्रदर्शन  

 

येवला : प्रतिनिधी


मोबाईलच्या सहाय्याने चालणारा ट्रॅक्टर,घरपोच कृषिनिविष्ठा, मानवचलीत कापणी व पेंडी बांधण्याचे हार्वेस्टर यंत्र अश्या अदयावत यंत्रसामग्रीने लासलगाव येथील कृषी प्रदर्शन आधुनिक माहितीचा खजिना देत लक्षवेधी ठरले.विशेष म्हणजे विध्यार्थ्यांच्या पुढाकारातून हे प्रदर्शन भरवले गेले.

बाभूळगाव येथील कृषि महाविदयालयाच्या पुढाकाराने लासलगावच्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भव्य कृषिप्रदर्शन पार पडले.शेतकऱ्यांना नवनविन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि बळीराजाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आमदार नरेंद्र दराडे व किशोर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदर्शन भरवण्यात आले. प्रदर्शनाचे उदघाटन बाजार समितीचे संचालक रमेश पालवे यांच्या हस्ते झाले.यावेळी पंढरीनाथ थोरे,योगेश पाटील, डॉ.विलास कांगणे, दिपक परदेशी, मधुकर गायकर,शिवा सुरासे,प्राचार्य डॉ. दिनेश कुळधर आदी उपस्थित होते.

मान्यवरांचे मार्गदर्शनपर मनोगताने तसेच कंपन्यांच्या स्टॉलला प्रत्यक्ष भेटीने सुरुवात झाली.या कृषिप्रदर्शनामध्ये १५ नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवून प्रदर्शनातून शेतकऱ्यांना अमुल्य माहिती दिली.प्रदर्शनात मोबाईल आधारीत ट्रॅक्टर ऑपरेटिंग, जयकिसान प्रा. लि. यांचे शेतकऱ्यांना घरपोच कृषिनिविष्ठा, तसेच मानवचलीत  गहू, ज्वारी, बाजरी, मका कापणी व पेंडी बांधणे कंबाईन हार्वेस्टर यंत्र मुख्य आकर्षण ठरले. सहभागी कंपन्यांनी आपआपले प्रत्यक्ष डेमो देवून सादरीकरण केले. विविध तंत्रज्ञानाचे बदलते स्वरूप व आधुनिक शेती याविषयी शेतकरी बांधवांसाठी चर्चासत्रसुद्धा घेण्यात आले.कृषि महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश कुळधर यांनी रोग किड एकात्मिक नियंत्रण तर डॉ.एस. डी. थोरात यांनी अन्नद्रव्य व तणव्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. प्रा.एन.बी.शिंदे, प्रा.आर.एस.नरोटे, प्रा. जे.एस.राठोड, प्रा.युवराज ठोंबरे, प्रा.व्ही.बी.रोहमारे, प्रा.के.एम.मुठाळ, प्रा.के.ए.माळी, प्रा.एस.बी.पगारे, प्रा.पी.जी.झिरवाळ, प्रा.एम.जी.ढगे,प्रा.ए.एस.आहेर, व कृषिदूतांनी संयोजन केले.  

फोटो

Yeola 26_1 लासलगाव : येथील कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करतांना रमेश पालवे,पंढरीनाथ थोरे,योगेश पाटील, डॉ.विलास कांगणे,शिवा सुरासे,प्राचार्य डॉ.दिनेश कुळधर आदी

Yeola 26_2 लासलगाव : येथील कृषी प्रदर्शनातील अद्यावत मानवचलीत कापणी व पेंडी बांधण्याचे हार्वेस्टर यंत्र


 
 
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity