ताज्या घडामोडी :

.

.
Home » » झोपडी आगीत भस्मसात होऊन राजापूर येथील आदिवासी कुटुंब उघड्यावर

झोपडी आगीत भस्मसात होऊन राजापूर येथील आदिवासी कुटुंब उघड्यावर

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१८ | सोमवार, ऑक्टोबर २२, २०१८झोपडी आगीत भस्मसात होऊन राजापूर येथील आदिवासी कुटुंब उघड्यावर

 

येवला  : प्रतिनिधी

राजापूर येथील अलगट वस्ती परिसरातील नामदेव ठाकरे यांच्या झोपडीला अचानक आग लागून सर्व संसार जाऊन खास झाला आहे.रोजंदारी करणारे हे आदिवासी कुटुंब उघड्यावर आले आहे.

अलगट वस्ती परिसरातील सोनतळे या ठिकाणी झोपडी करून नामदेव ठाकरे आपल्या पत्नी व मुलाबाळांसह रहात होते. पाचटाची झोपडी त्यात संसार उपयोगी साहित्य,कपडे,धान्य आदि साहित्य होते. रोजंदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या ठाकरे मात्र या घटनेने उघड्यावर आले आहे.या झोपडीत वीजपुरवठा नव्हता मात्र दुपारी बारा वाजेच्या दरम्यान अचानक आग लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान धान्य,कपडे व भांडे जळून राखरांगोळी झाल्याने ठाकरे यांना मदतीची अपेक्षा मदतीची गरज आहे. दानशुरांनी या आदिवासी कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान आज उपसरपंच सुमन बाळू अलगट व स्थानिक पदाधिकार्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत त्यांचे सांत्वन केले.

Yeola 22_5

राजापूर : आगीत भस्मसात झालेली नामदेव ठाकरे यांची झोपडी व संसारShare this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity