ताज्या घडामोडी :
Home » » जवान शेळकेंच्या मृत्यूची केंद्रीयस्तरावर चौकशी करावी ना. गिरीष महाजन यांची मागणी

जवान शेळकेंच्या मृत्यूची केंद्रीयस्तरावर चौकशी करावी ना. गिरीष महाजन यांची मागणी

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१८ | गुरुवार, ऑक्टोबर ११, २०१८




जवान शेळकेंच्या मृत्यूची केंद्रीयस्तरावर चौकशी करावी
ना. गिरीष महाजन यांची मागणी

 येवला : प्रतिनिधी

तालुक्यातील मानोरी येथील दिगंबर शेळके या जवानाचा ड्युटीवर असतांना आसाम येथे संशयस्पद झालेल्या मृत्यूचा केंद्रीय स्तरावर चौकशी करण्याची मागणी पालकमंत्री गिरीष महाजन यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
भाजपा नेते बाबा डमाळे यांच्या मागणीनुसार पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे म्हटले आहे की, मानोरी येथील जवान दिगंबर शेळके हे तुकडी न. ओसाई ३० बटालियन १ तेजपूर आसाम येथे ड्युटीवर असतांना त्यांचा २३ नाव्हेंबर रोजी संशायास्पद मृत्यू झाला असून त्यांनी गोळी मारुन आत्महत्या केली असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात येत असले तरी शेळके यांच्या कुटबियांच्या म्हणण्यानुसार हा घातपात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय स्तरावर या बाबत चौकशी करण्यासाठी ना. गिरीष महाजन यांनी विनंती केली आहे. तसेच आवश्यक ती कार्यवाही करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity