ताज्या घडामोडी :

.

.
Home » » भुजबळ यांना झेड प्‍लस सुरक्षा मिळावी

भुजबळ यांना झेड प्‍लस सुरक्षा मिळावी

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१८ | सोमवार, ऑक्टोबर २९, २०१८



भुजबळ यांना झेड प्‍लस सुरक्षा मिळावी 

येवला : प्रतिनिधी
 छगन भुजबळ साहेब यांना आलेल्‍या धमकीच्‍या पत्रास  आनुसरुन आरोपीवर कार्यवाही करणे व छगन भुजबळ यांना झेड प्‍लस सुरक्षा मिळावी अशी मागणी राष्‍ट्रवादी कॉंग्रेस व राष्‍ट्रवादी युवक कॉंग्रेस तर्फे मा. तहसिलदार साहेब येवला यांना निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे. दि. 28.10.2018 रोजी सकाळी टपालाद्वारे अज्ञात इसमाने मा. छगनरावजी भुजबळ साहेब यांना मनुस्‍मृतीस विरोध करीत राहील्‍यास दाभोळकर, पानसरे यांच्‍या प्रमाणे तुमचीही हत्‍या करण्‍यात येईल. अशी धमकी दिली. छगन भुजबळ हे राष्‍ट्रीय नेते असुन देशाच्‍या व राज्‍याच्‍या जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे. बहुजनांच्‍या न्‍याय हक्‍कासाठी ते नेहमीच लढत असतात. समता परिषदेच्‍या माध्‍यमातुन ते देशपातळीवर सर्वमान्‍य ओबीसींचे नेते आहेत. अशा परिस्थितीत विघातक प्रवृत्‍तीच्‍या  लोकांनी निनावी पत्र पाठवून समाजात अशांतता पसरविण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे. या पत्रामुळे छगन भुजबळ यांच्‍या जिवीत्‍वास धोका निर्माण होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे भुजबळ साहेबांना शासनाने झेड प्‍लस सुरक्षा पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. भविष्‍यात भुजबळ साहेबांना कोणत्‍याही प्रकारची इजा झाल्‍यास त्‍यास शासन जबाबदारी राहील असे निवेदनात म्‍हटले आहे.

      छगन भुजबळ यांना आलेल्‍या धमकीच्‍या पत्रामुळे कार्यकर्त्‍यांच्‍या भावना तिव्र झालेल्‍या असुन यांचा उद्रेक होण्‍्या अगोदर वेळीच आरोपींना अटक करावी व छगन भुजबळ यांना झेड प्‍लस सुरक्षा द्यावी अशी मागणी करण्‍यात आली आहे.

      सदर प्रसंगी रा.कॉं. जेष्‍ठ नेत्‍या उषाताई शिंदे, अरुणमामा थोरात, बाळासाहेब लोखंडे, तालुकाध्‍्यक्ष साहेबराव मढवई, विधानसभाध्‍यक्ष वसंत पवार, युवक रा.कॉं. तालुकाध्‍यक्ष मोहन शेलार,  दिपक लोणारी, संजय बनकर, महेंद्र काले, प्रकाश वाघ, अकबर शाह, डॉ. संकेत शिंदे, शामा श्रीश्रीमाळ, निर्मला थोरात, गणपत कांदळकर, सचिन कळमकर, देवीदास शेळके, भुषण लाघवे, सुभाष गांगुर्डे, अलका जेजुरकर, विमल शाह, निसार निंबुवाले, विजय जेजुरकर, तुळशीराम कोकाटे, दिपक देशमुख, विजय खोकले, ज्ञानेश्‍वर शेवाळे, रवी जगताप, प्रितम शहारे, विष्‍णूपंत क-हेकर, गोटु मांजरे, साहेबराव आहेर, अशोक मेंगाणे, गजानन गायकवाड, अंबादास शिनगर, सचिन सोनवणे, गोरख काळे, भाऊसाहेब कळसकर अदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity