ताज्या घडामोडी :

.

.
Home » » येवल्यात बीएचआर पतसंस्थेचा ठेवीदारांच्या मेळाव्यात ठेवीदार आक्रमक

येवल्यात बीएचआर पतसंस्थेचा ठेवीदारांच्या मेळाव्यात ठेवीदार आक्रमक

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१८ | मंगळवार, ऑक्टोबर ०२, २०१८

येवल्यात बीएचआर पतसंस्थेचा ठेवीदारांच्या मेळाव्यात ठेवीदार आक्रमक 

 

येवला : प्रतिनिधी

 बीएचआर  मल्टीस्टेट पतसंस्थेचे अवसायाकाचे कामकाजातील मनमानीमुळे ठेवीदारांचे पैसे मिळत नाहीत.ठेवीदारांचे अडकलेले पैसे मिळण्यासाठी अवसायक काढून प्रशासक नेमावा अशी मागणी येथील मेळाव्यात संघर्ष समितीचे पदाधिकारी व ठेवीदारांनी केली.

येथील बीएचआर ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी लक्ष्मण उगलमुगले हे उपस्थित होते तर बैठकीस जळगाव येथील संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गिरधर डाभी, कार्याध्यक्ष अशोक मंडोरे हे उपस्थित होते.

सेंट्रल रजिष्ट्रार दिल्ली यांनी सदर संस्था अवसायनात काढण्यापुर्वी कुठलाही सारासर विचार केलेला नसुन संस्था अवसायनात काढल्याने ठेवीदारांचे व्याजाचे नुकसान झाले आहे. त्याउलट जर प्रशासन नेमले असते तर व्याजाचे नुकसान न होता सरळ पैसे मिळाले असते. पतसंस्था जिवंत राहिली तर पैसे मिळतील त्यासाठी अवसायक काढुन प्रशासक नेमणे गरजेचे आहे असे डाभी यांनी यावेळी सांगीतले.राज्यातील सर्व ठेवीदारांनी नेटाने लढा दिला तरच हे शक्य असल्याचे डाभी म्हणाले.ठेवीदारांनी एकजुट ठेवली साथ दिली तर सर्वांचे पैसे मिळतील अशी शास्वती देत आपल्या लढा अधिक तीव्र करण्यासाठी पुढील मोर्चा पुणे येथील सहकार आयुक्त कार्यालयावर काढुन अवसायक काढून प्रशासक नेमण्याची मागणी करावी लागणार असल्याचे मंडारे म्हणाले.

मोठ्या अपेक्षेने ठेवलेले पैसे अडकल्याने गरजा भागवणे व संसार चालवणे जिकरीचे बनले आहे.आमच्या आर्थिक व मानसिक स्थितीचा विचार करून शासनाने याप्रकरणी दखल घ्यावी व न्याय द्यावा अशी मागणी यावेळी ठेवीदार दिलीप नागरे, वसंत गोसावी, निकम, संजय सोनवणे, नागडेकर आदींनी मनोगत व्यक्त करून केली.भाजपाचे आनंद शिंदे यांनी खासदारांमार्फत मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. बैठकीचे नियोजन आत्माराम जगताप, सोपान सानप यांनी केले. सुत्रसंचालन कृष्णा शिंदे यांनी केले.


येवला : बीएचआर  पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या मेळाव्यात बोलतांना संघर्ष समितीचे राज्य उपाध्यक्ष गिरधर डाभी.व्यासपीठावर पदाधिकारी. Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity