ताज्या घडामोडी :

.

.
Home » » केंद्र शासनाच्या शासकीय आधार भुत किमंत योजने अंतर्गत मुग ' उडिद व सोयाबीन च्या शासकीय खरेदीचा शुभारंभ

केंद्र शासनाच्या शासकीय आधार भुत किमंत योजने अंतर्गत मुग ' उडिद व सोयाबीन च्या शासकीय खरेदीचा शुभारंभ

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१८ | सोमवार, ऑक्टोबर २९, २०१८

केंद्र शासनाच्या शासकीय आधार भुत किमंत योजने अंतर्गत मुग ' उडिद व सोयाबीन च्या शासकीय खरेदीचा शुभारंभ 

येवला : प्रतिनिधी

येवला तालुका खरेदी विक्री संघाच्या आवारात विधान परिषद आमदार  .नरेंद्रजी दराडे यांचे हस्ते पार पडला महाराष्ट्र राज्य कापुस पणन महासंघ अध्यक्षा उषाताई शिंदे अध्यक्षस्थानी होत्या   तर प्रमुख पाहुणे म्हणुन सहकार नेते अंबादास बनकर, माजी प . स . सभापती शिवसेना नेते  संभाजीर पवार , जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्हि.एस. इंगळे आदि . उपस्थित होते .             ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोदंणी केली त्यांचा मुग रू . ६९७५ उडिद रू. ५६०० व सोयाबीन रू . ३३९९  रुपये प्रति क्विटल दराने खरेदी केला जाणार आहे . मकाची ऑनलाईन नोंदणी दि . १ नोव्हेंबर पासुन संघकार्यालयात सुरु होणार असल्याची माहिती संघाचे चेअरमन दिनेश आव्हाड यांनी दिली . यावेळी नोदंणी साठी मका पिकाची ऑनलाईन नोंदणी असलेला ७l१२ उतारा , आधार कार्ड , बँक पासबुक झेरॉक्स या कागदपत्रा पुर्तता होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले . संघाचे कामकाजाचे कौतुक करत असताना तालुका ही दुष्काळ ग्रस्त जाहीर करणे साठी तालुक्या तील सर्व नेते कार्यकर्त्यानी एकत्र येऊन एकजुटीने लढा उभारणे गरजेचे आहे . येवला तालुक्याची भयावह परिस्थीती लक्षात घेऊनच तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा जनावरे साठी चारा पाण्याची सोय व्हावी जनतेचा हाताला काम मिळावे आदि . मागण्याचे निवेदनही मुख्यमंत्र्यांना आपण दिल्याचे आमदार नरेंद्रजी दराडे यांनी आपल्या भाषणातुन सांगीतले खरेदी विक्री संघाचे कामकाज समाधान कारक असुन संघाला मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचे सांगुन शेतकऱ्यांनी आपला शेतमाल या योजने अंतर्गतच संघामार्फत विक्री करावा असे आवाहन आमदार नरेंद्र दराडे यांनी केले  .
                विक्री साठी आणलेला मालाची आद्रता १२ % व काडी कचरा नसलेला स्वच्छ प्रतिचा FAQ दर्जाचाच माल शेतकरी बांधवानी खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा असे आवाहन जिल्हा मार्केटिंग आधिकारी व्हि. एस . इंगळे व संघाचे व्यवस्थापक बाबासाहेब जाधव यांनी केले .        मान्यवरांचा सत्कार याप्रसंगी खरेदी विक्री संघाच्या वतीने करण्यात आला . या शुभारंभास संस्थेचे चेअरमन दिनेश आव्हाड , महाराष्ट्र राज्य कापुस महासंघ सल्लागार समिती संचालक भागुनाथ उशीर , माजी चेअरमन रांजेद्र गायकवाड , संचालक दामु पा पवार , दत्ता आहेर , जनार्दन खिल्लारे , शिवाजी धनगे, भास्कर येवले , दत्तात्रय वैद्य , नाना शेळके ,दगडु टर्ले , जगन्नाथ बोराडे प्रथम शेतकरी खंडू ढोकणे , अरुणबापु काळे , वाल्मीक गोरे , जगनराव मुंढे , सर्जेराव सावंत , अॅड बापु गायकवाड ,  रमेश वाघ , श्रीराम आव्हाड , हरिष मुंढे ,  रघुनाथ जमधडे आदि . शेतकरी बांधव उपस्थित होते . संघाचे व्यवस्थापक बाबासाहेब जाधव नंदकिशोर भोरकडे , संतोष खकाळे यांनी कार्यकमाचे प्रयोजन केले .
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity