ताज्या घडामोडी :

.

.
Home » » रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्याचे दोन रोटेशन द्या-- डमाळे मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांना निवेदन

रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्याचे दोन रोटेशन द्या-- डमाळे मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांना निवेदन

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८ | रविवार, ऑक्टोबर १४, २०१८





रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्याचे दोन रोटेशन द्या-- डमाळे
 मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांना निवेदन
येवला : प्रतिनिधी
पालखेड डाव्या कालव्याची सिंचनाचे रब्बी हंगामासाठी असणारे दोन रोटेशन व चारी क्रमांक 46 ते 52 वरील सर्व बंधारे पिण्यासाठी पाण्याने भरून देण्यात यावे अशी मागणी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश  महाजन यांना संयुक्तरित्या भाजपा नेते बाबा डमाळे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
 ना.चंद्रकांत पाटील व ना. गिरीश महाजन नाशिक जिल्हा दौऱ्यावर असताना दिंडोरी येथे बाबा डमाळे यांच्या एका शिष्टमंडळाने मंत्री महोदयांची भेट घेऊन चर्चा करत,निवेदन देत म्हटले आहे की जायकवाडी जलाशयात 30 टीएमसी पाणी शिल्लक आहे त्यांना केवळ नऊ टीएमसी पाणी पिण्यासाठी लागते त्यामुळे त्या पाण्यावर त्यांचे नियोजन करण्यात यावे. दुष्काळ परिस्थिती असल्या कारणाने अन्य धरणातील पाणी सोडण्याचे कारणच नाही.त्याच प्रमाणे पिण्याचे आरक्षित पाणी काही महसूल अधिकारी आपले हितसंबंध जपण्यासाठी नको तिकडे आरक्षित करण्याची घाई-घिसड करत असतात. दुष्काळाच्या या गंभीर परिस्थितीत आवश्यक असणारेच पाणी आरक्षित करण्यात यावे असे डमाळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
पालखेड डावा तट कालव्याचे सिंचनाची पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वगळून रबी चे पहिले रोटेशन 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर व दुसरे 1ते 28 फेब्रुवारी च्या दरम्यान देण्यात यावे असे समान दोन नियोजन करण्यात यावे तसेच चारी क्रमांक 46 ते52 वरील सर्व बंधारे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात यावे असे डमाळे यांनी म्हटले आहे.या शिष्टमंडळात रामू भागवत,बाळासाहेब काळे, अण्णासाहेब ढोले यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते तर या निवेदनावर बाबा शंकर सोनवणे , अमोल सोनवणे, भगवान सोनवणे,जगदीश गायकवाड, अरुण देवरे,नाना शेळके, संतोष वलटे,स॔पत बोरणारे, दिलीप बोराडे, बाबासाहेब भुसारे, सुरेश झगळे, दत्तु बोरणारे, कृष्णा कवात, संजय सोपान भागवत, अविनाश भागवत, रावसाहेब भागवत, रामभाऊ गायकवाड,सचिन आहेर, कृष्णा पोटे, ज्ञानेश्वर मढवाई,  माणिकराव दौंडे, माणिकराव रसाळ, गंगाधर शिंदे, रामभाऊ शेळके उल्हास गायकवाड, प्रकाश बजाज, कचरू गवळी, विकास कोल्हे, दीपक कोल्हे, गणेश गाडेकर ,कपिल देशमुख, शंकर गवळी, बबनराव मढवई, महेश मडवई, गंगाधर शिंदे, सचिन शिंदे,विकास गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या सह्या आहे.

Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity