ताज्या घडामोडी :

.

.
Home » » विखुरलेल्या हिंदु संघटीत करण्याकरीता संघ परिवार : बच्छाव येवल्यात कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग संपन्न

विखुरलेल्या हिंदु संघटीत करण्याकरीता संघ परिवार : बच्छाव येवल्यात कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग संपन्न

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१८ | मंगळवार, ऑक्टोबर ३०, २०१८




विखुरलेल्या हिंदु संघटीत करण्याकरीता संघ परिवार : बच्छाव

येवल्यात कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग संपन्न

 येवला : प्रतिनिधी
जाती-पातीमध्ये विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी, हिंदुंचा छळ थांबवण्यासाठी, राष्ट्र भक्ती, देशभक्ती, निस्वार्थी, चरित्रवाण नागरिक घडविण्यासाठी, या देशाला कायमस्वरुपी वैभव मिळवुन देण्यासाठी, हिंदुंची एकत्रीत शक्ती निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती झाल्याची माहिती संघाचे नाशिक विभागीय धर्म प्रसारक आबासाहेब बच्छाव यांनी दिली.
पंडीत दिनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग मंगळवार दि. ३० रोजी येवला येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी वक्त्यांना वेगवेगळे विषय देण्यात आले होते. संघा विषयी बच्छाव पुढे म्हणाले की, भगव्या ध्वजाला गुरु माणून भारत मातेची प्रार्थना करत देशाविषयी अभिमान व देशभक्तीचे प्रशिक्षण देत   जगातील ४८ देशासह भारतात ७५ हजार शाखा रोज कानाकोपर्‍यात चालु आहे. युनोने याचा सर्वे केला असून भुकूंप, महापूर अथवा मोठ्या संकट काळात मदतीला धावून जाणारी ही एकमेव मोठी सामाजिक संघटना असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या उज्वला गॅस, प्रंतप्रधान आवास योजना, रस्त्याचे बांधकामे, खते, कृषी, पाणी आदी लोकांभिमुख योजनेबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव यांनी उहापोह केला तर भाजपा जिल्हा प्रवक्ते विजय साणे यांनी बुथ प्रमुख, मतदार, मराठा व अन्य आरक्षण आदीबाबत मार्गदर्शन केले. भाजपा जिल्हा संघटक सरचिटणीस बापू पाटील यांनी जनसंघ ते भाजप व पतंप्रधान नरेंद्र मोदी इथपर्यंत पक्षाचा प्रवास सांगितला. भाजपा नेते बाबा डमाळे यांनी केंद्र ते महाराष्ट्र सरकार, नदी जोड प्रकल्प, नार-पार प्रकल्प, पुणेगाव-दरसवाडी-मांजरपाडा प्रकल्प आदी पाणी प्रकल्पांवर माहिती देत केंद्राने महाराष्ट्राला साडे एकोनावीस हजार कोटी रुपये जलसिंचनाच्या अपूर्ण प्रकल्पांकरीता दिले असल्याचे सांगितले. भाजपा चिटणीस भाऊराव निकम यांनी कार्यकर्त्यांची जडण-घडण यावर तर अजित तागडे व अमित वाढे यांनी बुथ प्रमुखाची रचना बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. नानासाहेब लहरे, प्रास्ताविक शहराध्यक्ष आनंद शिंदे तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष राजेंद्र परदेशी यांनी केले. प्रशिक्षण वर्गास तालुक्यातील पदाधिकारी व बुथ प्रमुखांसह गोरख खैरनार, दत्ता सानप, दिनेश परदेशी, कुणाल सुर्यवंशी, सखाहरी लासुरे, बंन्टी भावसार, विरेंद्र मोहारे, बाळासाहेब कुर्‍हे, युवराज पाटोळे, छगन दिवटे, अशोक देवरे, संतोष केंद्रे, सचिन मगर, गणेश गायकवाड, रोहन डमाळे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity