ताज्या घडामोडी :
Home » » ओम गुरुदेव इंग्लिश मिडीयम चे कराटे स्पर्धेत यश

ओम गुरुदेव इंग्लिश मिडीयम चे कराटे स्पर्धेत यश

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, ७ ऑक्टोबर, २०१८ | रविवार, ऑक्टोबर ०७, २०१८

 

ओम गुरुदेव इंग्लिश मिडीयम चे कराटे स्पर्धेत यश

येवला - प्रतिनिधी

नुकत्याच नाशिक येथे आर्यन कराटे एकॅडेमीच्या वतीने घेण्यात आलेल्या कराटे स्पर्धेमध्ये येवला शहरातील ओम गुरुदेव इंग्लिश मिडीयम गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. स्पर्धेमध्ये सहभागी असलेल्या अकरा खेळाडूपैकी पवन रुपेश मांजरे, भूमी राकेश मांजरे यांनी सुवर्णपदक मिळवले. तर पायल थळकर,सर्वेश गाडेकर,रोशनी कोतवाल,श्रेयस नागरपुरे,आर्यन बोरसे यांनी रौप्यपदक मिळवले.समिक्षा थळकर,वैष्णवी चव्हाण,आदित्य आहेर,सर्वेश चव्हाण यानी कांस्यपदक मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांना अविाश बोंडारे यांचे मार्गदर्श लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष हनुमंत भोगंळे,प्रा. तुषार कापसे व शिक्षकांनी अभिनंदन केले.

Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity