ताज्या घडामोडी :

.

.
Home » » ३५ वर्षापासून कोटमगाव यात्रेत विनामूल्य पादत्राणे सेवा धडपड मंच चा उपक्रम

३५ वर्षापासून कोटमगाव यात्रेत विनामूल्य पादत्राणे सेवा धडपड मंच चा उपक्रम

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८ | रविवार, ऑक्टोबर १४, २०१८

३५ वर्षापासून कोटमगाव यात्रेत विनामूल्य पादत्राणे सेवा

धडपड मंच चा उपक्रम

येवला : प्रतिनिधी


तिर्थस्थळी जाणे हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वर्षातुन एकदा तरी मणुष्य यात्रेच्या निमित्ताने देवदर्शनास सहकुटुंब जात असतो. दर्शनासाठी जातांना बाहेर काढून ठेवलेली चप्पल-बुट मंदिरातुन दर्शन करुन बाहेर आल्यावर गायब झाल्याचे दिसले की वाईट वाटते. हा निष्कारण भुर्दंड पडतो. हि छोटी गोष्ट लक्षात घेऊन देवदर्शनास येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी त्यांची पादत्राणे मोफत सांभाळण्याचे काम येवल्यातील धडपड मंच या सामाजीक संस्थेतर्फे गेल्या ३५ वर्षांपासुन येवला शहरापासून जवळच असलेल्या कोटमगाव येथील श्री जगदंबा माता नवरात्र यात्रोत्सवात अव्याहतपणे चालु आहे.  त्यांच्या या अनमोल कार्याचा परिचय सर्वांनाच आदर्शवत ठरत आहे. 

येवल्यातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी हि चरणसेवा सन १९८३ पासुन येवला तालुक्यातील कोटमगाव येथे सुरु करण्यात केली असून भक्तांना आपली पादत्राणे चोरीला न जाता निर्धास्तपणे देवीचे दर्शन घेता यावे म्हणुन या मंदिराचे जवळच सुंदर असा 'मोफत चरण सेवा' या नावाचा स्टॉल लावलेला आपणांस दिसेल.  तेथे प्रभाकर झळके व त्यांचे सहकारी कार्यकर्ते  हसतमुखाने भाविकांची पादत्राणे आपल्या हाती घेऊन ती योग्य नंबरवर ठेवुन त्या नंबरचे टोकण आपणांस देतील व दर्शन घेवुन आल्यानंतर आपण ते टोकण दाखविल्यानंतर त्या नंबरवरची आपलीच पादत्राणे आपणांस दिली जातात.  संपूर्ण नवरात्रात म्हणजे दहा दिवस रोज ही सेवा अखंडपणे चालु असुन गेल्या ३५ वर्षांपासुन या सेवेत खंड पडलेला नाही. विशेष म्हणजे ही संपुर्ण सेवा विनामुल्य आहे. कोटमगाव येथे येणारे भाविक वर्षनुवर्षं या सेवेचा लाभ घेत असून भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून यापुढेही ती चालू राहावी अशी इच्छा इथे येणारे भाविक व्यक्त करतात.  

या चरणसेवेसाठी प्रभाकर झळके यांना मुकेश लचके, प्रभाकर अहिरे, गोपाळ गुरगुडे, श्रावण शेलार, सचिन धकाते,  नागपुरे, विक्रांत कदम, रोशन पाटील, संकेत फरताळे, पंकज कुक्कर, ओंकार मिस्त्री, मंगेश रहाणे, संतोष खंदारे, सचिन वारे, कमलसिंग ठाकूर यांचे सहकार्य लाभते,  शिवाय काही तरुण उत्स्फूर्तपणे थोडा थोडा वेळ आपले योगदान देत असतात. तसेच यात्रोत्सवातील एक दिवस येथील कच्छ कडवा पाटीदार कुटुंबीय दरवर्षी नियमित सेवा देतात.

Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity