ताज्या घडामोडी :

.

.
Home » » राज्यस्तरीय कृषिथॉन आदर्श जल संवर्धक पुरस्कार सोनवणे यांना प्रदान

राज्यस्तरीय कृषिथॉन आदर्श जल संवर्धक पुरस्कार सोनवणे यांना प्रदान

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१८ | शनिवार, नोव्हेंबर २४, २०१८

राज्यस्तरीय कृषिथॉन आदर्श जल संवर्धक पुरस्कार सोनवणे यांना प्रदान


येवला : प्रतिनिधी

राज्यस्तरीय कृषिथॉन आदर्श जल संवर्धक पुरस्कार  तालुका जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवतराव सोनवणे यांना राज्याचे माजी कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जल संधारण खात्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ह्यूमन सर्व्हिस फौंडेशन व कृषिथॉन आंतरराष्ट्रीय प्रदर्शन यांच्याकडून  दरवर्षी  कृषी व सिंचन क्षेत्रात राज्यात पथदर्शी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना पुरस्कार देऊन गौरविले जाते.

शासनाच्या जल आणि मृद संधारणाच्या योजना गावात लोकसहभागातुन प्रभावीपणे राबवून आदर्शवत काम सोनवणे यांनी उभे केले आहे.
याची दखल घेऊन यांना कृषीथॉन 2018 चा आदर्श जल संवर्धक पुरस्कार  आज दि २४ नोव्हेंबर रोजी देण्यात  आला.वनाधिपती माजी मंत्री विनायक दादा पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते.

येवला तालुक्यात मराठवाड्या च्या सरहद्दीवर असलेल्या रहाडी येथे २०१८ मध्ये बाळगंगा साठवण तलावाच्या माध्यमातून राज्यात पथदर्शी असे काम झाले आहे. ६०० एकर शेती साठी सिंचन क्षमता तसे पिण्याच्या पाणी स्थानिक पातळीवर उपलब्ध झाली आहे.

आंदोलने , उपोषणे या मार्गाने बाळगंगा तलावाच्या दुरुस्तीसाठी १९ लाख ८४ हजार रुपयांचा निधी जलयुक्त शिवार योजनेतुन जलहक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे यांच्या पाठपुराव्याने उपलब्ध झाला होता.
३८ वर्षापूर्वी या मुख्य धरणाची भिंत फुटली होती. तेव्हापासून यामध्ये पाणी आडत नव्हते. मात्र, सोनवणे यांच्या पाठवुराव्याने निधी मंजुर होवून प्रत्यक्ष धरणरेषेचे बांधकाम नव्याने करण्यात आले.९ दश लक्ष घन फुट पाणी साठवण्यासाठी क्षमता तयार झाली आहे. याच तलावा तुन  शासनाचा 2 रुपया ही खर्च न होता १७ सहस्त्र घनमिटर गाळ लोकसहभागातुन काढून शेतकर्‍यांच्या शेतात पोहचवला. गाळ काढल्याने गाव शिवारातील जमिन सुपीक होऊन १७ सहस्त्र घनमिटर इतके अधिकची साठवण क्षमता असा दुहेरी लाभ गावाला झाला आहे.

जेष्ठ कृषी अर्थ शास्त्रज्ञ मिलिंद मुरुंगकर, महाराष्ट्र बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष जयंत जायभावे, आमदार हेमंत टकले, कृषिथॉन चे संचालक संजय न्याहारकर,  अश्विनी न्याहारकर, नितीन मराठे,  व सिंचन क्षेत्रातील विविध मान्यवर यांनी सोनवणे यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन  मुकुंद पिंगळे यांनी केले.


Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity