ताज्या घडामोडी :

.

.
Home » » लहुजी साळवेंनी ज्योतिबांना संरक्षणाचे धडे दिले येवला येथे माजी उपमुख्यमंत्री भुजबळ मातंग समाज मेळाव्यात प्रतिपादन

लहुजी साळवेंनी ज्योतिबांना संरक्षणाचे धडे दिले येवला येथे माजी उपमुख्यमंत्री भुजबळ मातंग समाज मेळाव्यात प्रतिपादन

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, २ डिसेंबर, २०१८ | रविवार, डिसेंबर ०२, २०१८




लहुजी साळवेंनी ज्योतिबांना संरक्षणाचे धडे दिले
येवला येथे माजी उपमुख्यमंत्री भुजबळ मातंग समाज मेळाव्यात प्रतिपादन

 येवला :  प्रतिनिधी
वस्ताद लहुजी साळवे यांनी ज्योतिबांना संरक्षणाचे धडे दिले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लहुजी वस्ताद स्वतः लढले व त्यांनी अनेक क्रांतिकारक घडविले. म्हणून ते क्रांतीगुरु आहेत, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
 क्रांतीगुरु सोशल फाउंडेशन संघटनेच्या वतीने येथील महात्मा फुले नाट्यगृहात मातंग समाज मेळाव्याचे व राज्यस्तरीय क्रांतीगुरु समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार भुजबळ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे  संस्थापक अध्यक्ष राजू कांबळे होते.  व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार नरेंद्र दराडे, पंचायत समिती उपसभापती रुपचंद भागवत, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काळे, ऍड. माणिकराव शिंदे, प्रसिद्ध गायक चंदन कांबळे, जेष्ठ उद्योजक किशोर राठी, कामगार शक्तीचे अनिल सरवार, संभाजी पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकृष्ण सोनवणे, कोपरगावचे माजी नगराध्यक्ष रवींद्र पाठक, भारिप सिन्नरचे अध्यक्ष  प्रविण जाधव आदी उपस्थित होते.
सावित्रीबाईंच्या शाळेत जाणार्‍या पहिल्या मागासवर्गीय विद्यर्थीनी मुक्ता साळवे या लहुजी साळवे यांच्या नात होत्या. त्यांनी इंग्रज अधिकार्‍यांना उद्धेशुन लिहिलेल्या निबंधाला आजही खूप महत्व आहे, असेही भुजबळ म्हणाले. मातंग समाजाच्या वतीने दिलेल्या मागण्या मी शासनदरबारी मांडून समाजातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, सभागृह बांधून देऊ, असे आश्वासन दिले. समाजाने संघटन असेच टिकवून ठेवावी  भुजबळ म्हणाले.
मातंग समाज दिवसेंदिवस भूमिहीन होत आहे. अत्याचार होत आहेत. ही परिस्थिती बदलली नाही तर जशास तसे उत्तर दिले जाईल. भुजबळांनी येवल्याचा विकास केला पण मातंग समाज विकासापासून कोसो दूर आहे. विकासाची गाडी सुसाट सुटली. मातंग समाजाला या गाडीत बसायलाच मिळाले नाही, अशी खंत कांबळे यांनी व्यक्त केली.  हक्काचे व्यासपीठ  उपसभापती रूपचंद भागवत यांनी उपलब्ध करून दिले, असेही कांबळे म्हणाले. आण्णाभाऊ साठे व लहुजी साळवे यांचे स्मारक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भागवत यांनी सांगितले. शासनाने दखल नाही घेतली तर स्व खर्चातून स्मारक निर्मितीचे आश्वासन भागवत यांनी दिले. शिवव्याख्याते प्रा. जावेद शेख यांनी महापुरुषा ंविषयी प्रबोधन केले. यावेळी राज्यस्तरीय क्रांतीगुरु पुरस्काराचे वितरण करण्यात आले. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, प्रदीप सरोदे, विनोद राक्षे, चंदन कांबळे, अनिल कुंदे, दिनकर लांडगे, अंबादास खैरनार, संतोष आहिरे, अमोल आल्हाट, सचिन नेटारे, ज्ञानेश्वर पारखे, नामदेव साळवे, मीना शिरसाठ, बालुभाऊ आठवले, कृष्णा बडे, संजय कडनोर, सागर निकाळे आदींना यावेळी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी  अंकुश सोळसे, दिलीप सोळसे, संजय तूपसैंदर, विजय दोडके, भागीनाथ कांबळे, प्रमोद आदमाने, सुदाम कांबळे, चित्रा कांबळे, वाल्मिक खैरनार, परशराम साठे, मीरा आदमाने,  संजय खैरनार, मालन सोळसे, बाळा जोगदंड, राहुल पोळ, करण आव्हाड, रावसाहेब आव्हाड, राकेश आव्हाड आदींनी परिश्रम घेतले.

Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity