ताज्या घडामोडी :

.

.
Home » » विद्यार्थ्यांनी सुशिक्षित होण्याबरोबरच सुसंस्कृत व्हावे-....आमदार छगन भुजबळ

विद्यार्थ्यांनी सुशिक्षित होण्याबरोबरच सुसंस्कृत व्हावे-....आमदार छगन भुजबळ

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, ५ डिसेंबर, २०१८ | बुधवार, डिसेंबर ०५, २०१८


विद्यार्थ्यांनी सुशिक्षित होण्याबरोबरच सुसंस्कृत व्हावे-....आमदार छगन भुजबळ

येवला : प्रतिनिधी
विद्या हीच देवता व सेवा हाच धर्म समजून फक्त शिक्षणावरच लक्ष केंद्रित करावे.विद्यार्थ्यांनी अवांतर गोष्टींकडे लक्ष न देता फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रित करावे व ध्येयाप्रति वाटचाल करावी.असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री ना. छगनरावजी भुजबळ यांनी केले. येथील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्झोकेम विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी अवांतर गोष्टींकडे लक्ष न देता फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रित करावे व ध्येयाप्रति वाटचाल करावी. विद्या हीच देवता व सेवा हाच धर्म समजून फक्त शिक्षणावरच लक्ष केंद्रित करावे. विद्यार्थ्यांच्या यशासाठी शिक्षक प्रचंड मेहनत घेतात, त्या मेहनतीचं चीज विद्यार्थ्यांनी करावं. अंगी नम्रपणा असेल असेल तर कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी मार्ग सापडतोच असेही ते पुढे म्हणाले.सुशिक्षित व्यक्ती सुसंस्कृत असेलच असे नाही.परंतु अशिक्षित व्यक्तिदेखील सुसंस्कृत असते.त्यामुळे शिक्षण घेत असतांना सुसंस्कृत होणे देखील महत्वाचे आहे. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई व सेनापती तात्या टोपे व सरस्वतीच्या प्रतिमांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन करून झाली. इयत्ता 8 वीच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत तर 10 वी व 12 वीच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन सादर केले.विद्यालयाच्या एन.सी.सी.पथकाने पाहुण्यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अॅड माणिकराव शिंदे यांनी आपल्या मनोगतातून येवला तालुक्याची सततची दुष्काळी परिस्थिती, करंजवण धरणाची निर्मिती वर्णन करतानाच मांजरपाडा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा असा आशावाद व्यक्त केला.
संस्थेचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार रमेशचंद्र पटेल यांचा  'राष्ट्रीय पत्रकार रत्न' पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. सत्काराला उत्तर देताना रमेशचंद्र पटेल यांनी पत्रकारितेची सुरुवातीची स्थिती, येवला तालुक्याकडे सततचे उपेक्षित व दुर्लक्षित असणे अधोरेखित केले.लेखणीतून पाणीसह अन्य सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली असल्याचे सांगितले.येमकोच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल श्रीमती हर्षाबेन पटेल यांचाही याप्रसंगी प्रमुख अतिथींच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.  'महात्मा फुले समाजरत्न' पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे विश्वस्त सचिन कळमकर यांचाही याप्रसंगी सन्मान करण्यात आला.  त्याचप्रमाणे  विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमेश जाधव, रामदास कहार, केशव काळे, दिलीप पाखले यांचाही या सोहळ्यात सेवानिवृत्तीनिमित्त सन्मानित करण्यात आले.
       विद्यालयात मार्च 18 मध्ये एस.एस.सी. परीक्षेत प्रथम आलेल्या शुभांगी बोडके, इयत्ता  12 वी विज्ञान शाखेत प्रथम आलेली नेहा देवरे, 12 वी  वाणिज्यमध्ये प्रथम आलेली प्रगती वाडेकर, 12 वी कला शाखेत प्रथम प्रियांका मोरे, उंदिरवाडी विद्यालयात प्रथम मोनाली सोनवणे, धामणगाव विद्यालयात प्रथम प्रीती जेजुरकर यांचा गौरवपत्र, प्रमाणपत्र व रोख पारितोषिके  देऊन गौरविण्यात आले. तसेच विद्यालयाच्या उच्च माध्यमिक विभागाचा विद्यार्थी गोंडाळे याची गोळाफेकमध्ये व साक्षी लोणारी हिची 42 किलो गटात कुस्ती प्रकारात विभागावर निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आमदार छगन भुजबळ यांचा सत्कार संस्थाअध्यक्ष पंकज पारख,तर माणिकराव शिंदे यांचा सत्कार चिटणीस सुशील गुजराथी यांचे हस्ते करण्यात आला.रसिका चव्हाण, चैतन्य पराते, रसिका झोंड, श्रुती वारुळे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सोहळ्याची रंगत वाढवली.  
पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे चिटणीस सुशीलभाई गुजराथी यांनी केले, प्रास्तविक विद्यालयाचे प्राचार्य दत्ता महाले यांनी केले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष पंकज पारख, माजी चिटणीस प्रफुल्लभाई गुजराथी, कोषाध्यक्ष रवींद्र काळे, विश्वस्त सचिन कळमकर,सेवानिवृत्त शिक्षक दत्तू वाघ, सुरेश भावसार, सुभाष पाटोळे,विजया गुजराथी, एल. झेड. वाणी, सुमन वाणी, भुजबळ साहेबांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, लोंढेसाहेब,जि. प. नाशिकचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, सत्यजित कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, रत्नाकर तक्ते, अरुण काळे,मकरंद सोनवणे, प्रज्ज्वल पटेल, मनीष गुजराथी, ऍड. प्रतापराव आहेर, स्वरूपा पटेल,  विजय चंडालिया, विजया परदेशी, मीनल पटेल, मयुरा पटेल, धनश्री पटेल, देवेंद्र पटेल, वसंतराव पवार, साहेबराव मढवई, येवला पं. स.चे माजी सभापती प्रकाश वाघ आदींसह पत्रकार मित्र व बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होते.
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्सवप्रमुख दत्ता उटवाळे, पुष्पा कांबळे, सुरेश कोल्हे, उपप्राचार्य संजय बिरारी यांनी केले तर आभार प्रा.राजेंद्र गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक कैलास धनवटे, सतीश विसपुते, रमेश माळी, प्रकाश सोनवणे, चंपा रणदिवे, सुरेखा जाधव, गीता मुंगीकर, रंजना चौधरी, राम पटेल, सुरेश कोल्हे, अनिल शेलार, प्रेरणा जोशी, सुरेखा राजपूत, सुहासिनी शिंदे, गीताश्री शिंदे,बाळासाहेब हिरे, वीणा पराते, सरस्वती नागपुरे, आसावरी जोशी, सारिका चौधरी, प्रेरणा जोशी, रिजवान शेख, पुरुषोत्तम रहाणे, माधवराव गायकवाड, कैलास चौधरी, अविनाश कुलकर्णी,  प्रसेन पटेल,  नम्रता ससाणे, वनिता वाघ,  स्वाती सानप, शीतल शिंदे, विजय पैठणे, रामेश्वरी शिंदे, सागर लोणारी, संजय ढोले,  शुभांगी खाखरिया, पुष्पा कांबळे, कैलास पाटील, विजय क्षीरसागर, प्रशांत नागरे, मच्छिंद्र नाईकवाडे, विशाल कळमकर, रामेश्वरी शिंदे, अनिल पगारे, विजय मोकळ, भास्कर लहरे, संदीप खोजे, अशोक सोनवणे, मारुती माळी, अंकुश ललवाणी या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.
============================================
फोटो कॅप्शन 
सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्झोकेम विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष रमेशचंद्र पटेल यांचा सत्कार करतांना आमदार छगन भुजबळ,समवेत पंकज पारख,सुशील गुजराथी,माणिकराव शिंदे,हर्षाबेन पटेल,
 

 

 

Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity