ताज्या घडामोडी :

.

.
Home » » येवला तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांची परत गेलेली शिष्यवृत्ती पं .स सदस्य प्रविण गायकवाड यांच्या प्रयत्नाने मिळणार

येवला तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांची परत गेलेली शिष्यवृत्ती पं .स सदस्य प्रविण गायकवाड यांच्या प्रयत्नाने मिळणार

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, ९ डिसेंबर, २०१८ | रविवार, डिसेंबर ०९, २०१८येवला तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांची  परत गेलेली शिष्यवृत्ती पं .स सदस्य प्रविण गायकवाड यांच्या प्रयत्नाने मिळणार 

 येवला :  प्रतिनिधी
येवला तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांची २०१५-१६ मधील परत गेलेली ६८ लाख ५ हजार ६०० रुपये सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती पंचायत समिती सदस्य प्रविण गायकवाड यांच्या प्रयत्नाने मिळणार आहे. जिल्हा परिषद व आदिवासी विभाग नाशिक यांच्याकडे पाठपुरावा करुन तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी गायकवाड यांची जिल्हा परिषद सदस्य असतांना शिक्षण विभागावर असणारी पकड यामुळे ही शिष्यवृत्ती मंजुर करुन आणण्यात यश आले आहे.  यामुळे मागील ५ हजार २८९ विद्यार्थ्यांना  याचा लाभ होणार आहे. त्यात चालु वर्षाचे ३ हजार ७१८ आदिवासी विद्यार्थ्यांचे ४ हजार ६५ रुपये येवला तालुक्यातील मुख्याध्यापक यांच्या खात्यावर जमा केले आहे.
या शिष्यवृत्तीचा लाभ आदिवासी विद्यार्थ्यांना होणार आहे. सर्वसामान्य माणूस म्हणून ओळख असणारे प्रविण गायकवाड यांची नाळ सर्वसामान्य माणसासोबत जोडली आहे. त्यांनी खरीब विद्यार्थ्यांना खर्‍या अर्थाने न्याय मिळवुन दिला, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य गायकवाड होते. धामणगाव येथील महादेववाडी शाळेचा दर्जा सुधारला असून मुलांचे वाचन लेखन हे सुद्धा मोठ्या प्रमाणात सुधारले आहे. महादेववाडी येथे शासनाच्या दिनदयाळ उपाध्यय योजनेतुन घरो घरी मिटर बवण्यात आले आहे. त्यात आता या वस्तीला व शाळेला पाण्यासाठी विहिरीचा प्रस्ताव तयार केला असून त्यांचा पाठपुरावा सुरु आहे. येथील आदिवासी बांधवाने वन पट्टे मी जिल्हा परिषद सदस्य असतांना मंजूर केले होते. आज त्यांची शेती बघुन आनंद झाला व येथेच रोजगार असल्यामुळे १०० टक्के मुलांची शाळेत उपस्थितती आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी मी प्रयत्न केले व आपल्या सर्वच्या आशिर्वादाने मुलांना लाभ मिळाला, याचा मनस्वी आनंद आहे, असे प्रविण गायकवाड यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक राजेंद्र कोटकर यांनी केले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण ठाकरे, रंजीत परदेशी, ज्ञानेश्‍वर वाघ, भावसिंग पवार, रामकृष्ण वाघमारे, ईश्‍वर ठाकरे, रामदास सोनवणे, संतोष गांगुर्डे, माणिक माळी, सुनील सोनवणे आदी उपस्थित होते.


Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity