ताज्या घडामोडी :

.

.
Home » » तब्बल 40 वर्षांनी एकत्र जमले 'एन्झोकेम'चे माजी विद्यार्थी....शाळेविषयी कृतीतून व्यक्त केली कृतज्ञता दोन वर्ग केले डिजिटल....

तब्बल 40 वर्षांनी एकत्र जमले 'एन्झोकेम'चे माजी विद्यार्थी....शाळेविषयी कृतीतून व्यक्त केली कृतज्ञता दोन वर्ग केले डिजिटल....

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, १५ जुलै, २०१९ | सोमवार, जुलै १५, २०१९



तब्बल 40 वर्षांनी एकत्र जमले 'एन्झोकेम'चे माजी विद्यार्थी....शाळेविषयी कृतीतून व्यक्त केली कृतज्ञता 
दोन वर्ग केले डिजिटल.........गरजू विद्यार्थी विकासासाठी दिली 31 हजाराची देणगी दिली 
येवला:    प्रतिनिधी
येथील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल अर्थात सध्याच्या एन्झोकेम विद्यालयातील 1979च्या  एस.एस.सी. बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला. दहावीनंतर वेगवेगळ्या वाटांनी दूर गेलेले हे  बालमित्र  व त्यांचे 13 गुरुजन काल तब्बल 40 वर्षांनी हे पुन्हा एकत्र आले. आनंद, कौतुक व आश्चर्य अशा भावना त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. 1979च्या  एस.एस.सी. बॅचचे विद्यार्थी सिद्धार्थ लॉन्स एकत्रित जमले,
शनिवारी सकाळी 10.30 वाजता या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयात एनसी सी पथकाने सलामी देवून मानवंदना दिली.झांज व  ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने व राष्ट्रगीताने झाली. विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीतातून पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर जे कर्मचारी आपल्यातून कायमचे निघून गेले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
प्रारंभी शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून विद्यालयाचे  माजी  विद्यार्थी व सध्याचे प्राचार्य दत्ता महाले यांनी स्नेहमेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. विद्यालयाच्या  मोनिका वाबळे, सायली वाघमोडे, रसिका चव्हाण, श्रुती झोंड विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गुरुवर्य लक्ष्मण वाणी,बन्सीलाल बाफना, सुरेश भावसार, लक्ष्मण आढाव,गोविंद मोहनी,उषा आढाव, भगीरथ गायकवाड, प्रशांत पटेल, सुमन वाणी, शुभांगी धोपवकर, विजया गुजराथी, यांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते शाल, कृतज्ञता स्मृतीचिन्ह व  पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेनापती शिक्षण प्रसारक मंडळाचे  अध्यक्ष पंकज पारख होते.एसएससी 1979 च्या विद्यार्थ्यांच्या योगदानातून विद्यालयात दोन वर्गात डिजिटल वर्ग निर्माण करण्यात आले त्याचे उदघाटन गुरुवर्य   गोविंद मोहनी, व उद्योगपती भरत समदडीया,यांचे हस्ते करण्यात आले.माजी विद्यार्थ्यांपैकी मीना भिडे, ऋता बावडेकर, सुवर्णा मंडलेचा, गुलाबराव सोनवणे यांनी मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला. ऋता बावडेकर यांनी त्यांच्या वेळी मुलींचे एनसीसी पथक त्यावेळी नसल्याची खंत व्यक्त केली, पण यंदा मुलींचे एनसीसी पथक सुरु केल्याचा अभिमान वाटल्याचे सांगितले. गुरुजनांपैकी  बन्सीलाल बाफना,उषा आढाव, विजया गुजराथी,शुभांगी धोपवकर,गोविंद मोहनी, यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी  यांनी मनोगते व्यक्त केली. 1979 चे माजी विद्यार्थी सुवर्णा भंडारी,मीना भिडे, ऋता बावडेकर,यांनी भाषणातून शाळेतील आठवणी सांगितल्या.कार्यक्रमाचे नियोजन उपप्राचार्य संजय बिरारी, पर्यवेक्षक कैलास धनवटे व उत्सवप्रमुख दत्ता उटवाळे यांनी केले. सुत्रसंचलन दत्ता उटवाळे यांनी केले तर राजेंद्र गायकवाड यांनी आभार मानले.
दुपारच्या सत्रातील सिद्धार्थ लॉन्सच्या मेळाव्यात व्यक्तिगत परिचय,गाठीभेटीतुन जुन्या आठवणींना उजाळा देत विविध उत्स्फूर्त कार्यक्रम सादर केले.
यावेळी संस्था सरचिटणीस सुशील गुजराथी यांनी माजी विद्यार्थी एकत्र येऊन शाळा या अमूर्त मातेची आठवण ठेवून कृतज्ञता व्यक्त करतात हा खरा यशस्वीतेचा संस्कार असल्याचे सांगितले.यावेळी उत्स्फूर्त संस्कृतीक कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले.गुलाब सोनवणे(कार्यकारी अभियंता)सुनील संसारे, (स्वच्छता निरीक्षक) चंपालाल उपासे(डेपो एस टी ),नामदेव सोनवणे(स्थापत्य अभियांत्रिकी तज्ञ) यांचा सेवानिवृत्तीमुळे  
माजी विद्यार्थ्यांनी यथोचित सत्कार करण्यात आला.माजी विद्यार्थी कार्यकारी अभियंता गुलाब सोनवणे यांनी शाळेला रु 11000 व गरजू विद्यार्थ्यांना सहकार्य म्हणून दरवर्षी रु 5000 रुपये तर रुबी बँक व्यवस्थापक मीना भिडे,यांनी विद्यार्थी विकासासाठी 21000 हजार रुपयांची देणगी दिली.पसायदानाने समारोप करण्यात आला.मेळाव्यास माजी विद्यार्थी भरत समदडिया,ऋता बावडेकर, मीना भिडे,राजेश धसे, संजय रोडे,विजय धसे,केशव मांजरे,सुरेश शिंदे, यतीन पटेल,संजय नागपुरे, सुनील श्रीवास्तव, लक्ष्मण सदगुले, सीताराम जोशी, अनुराधा कुलकर्णी, सुभाष चौधरी,सुवर्णा भंडारी, अनुराधा पटेल, सुलेखा देसाई, सुनीता पेटकर, वेदवती पारीख, हेमा शेटे, चंपा बाकळे, पल्लवी पटेल, कल्याणी पटेल, कमला धांडे, शकुंतला सस्कर,लक्ष्मण साळुंके, राजेंद्र देवगांवकर,मदन डालकरी,सुरेखा कंदलकर, गुलाबराव सोनवणे,सुनील संसारे, वामन वाडेकर, शिवाजी जमधडे,चंपालाल उपासे, दत्तात्रय लगड,छाया निकम, विजय1 गायकवाड, नामदेव सोनवणे, संजय फुलपगार, नारायण जाधव,यांचेसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सारिका चौधरी,सुरेखा राजपूत, रंजना चौधरी, सरस्वती नागपुरे, वीणा पराते, वनिता वाघ, पुष्पा आहेर, पुष्पा कांबळे, प्रकाश सोनवणे, सतीश विसपुते, रमेश माळी, निलेश निकम, विजय पैठणे, राम पटेल, प्रसेन पटेल, रिजवान शेख, सुनील कोटमे, जनार्दन भनगडे, कैलास चौधरी, उत्तम पुंड, अविनाश कुलकर्णी, प्रेरणा जोशी, विजय क्षीरसागर, माधवराव गायकवाड, विजय मोकळ, भास्कर लहरे, सुरेश गायकवाड, संदीप खोजे, अनिल पगारे, अरविंद जोरी, अशोक सोनवणे, मारुती माळी इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.
===============================
फोटो कॅप्शन 
एन्झोकेम विद्यालयाचे एस एस सी 1979 चे माजी विद्यार्थी 40 वर्षानंतर पुन्हा भेटले......
    
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity