ताज्या घडामोडी :

.

.
Home » » मॉब लिचिंग च्या विरोधात येवल्यातून मुस्लिम समाजाचे निवेदन

मॉब लिचिंग च्या विरोधात येवल्यातून मुस्लिम समाजाचे निवेदन

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, ११ जुलै, २०१९ | गुरुवार, जुलै ११, २०१९

मॉब लिचिंग च्या विरोधात येवल्यातून मुस्लिम समाजाचे निवेदन

येवला : प्रतिनिधी

झारखंड मध्ये झालेल्या मॉब लिचिंग च्या विरोधात येवल्यातून मुस्लिम समाज तसेच अर्जुन कोकाटे भाऊसाहेब आहेर महिंद्र पगारे ऍड समीर देशमुख नानासाहेब शिंदे अजहर शाह रश्मी ताई पालवे अश्विनी जगदाळे रेखाताई साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले . यावेळी अजहर शाह यांनी सदर निवेदन सर्वाना वाचून सांगितले व अश्या घटना आपल्या देशात नेहमी होत असल्या तर आपल्या देशाचे भवितव्य धोक्यात येईल असे मनोगत व्यक्त केले . प्रा अर्जुन कोकाटे यांनी घडलेल्या घटनेच निषेध व्यक्त करत राष्ट्र सेवा दल अश्या घटनेचा निषेध करते तसेच महिलांनी आपली संख्या वाढवायला हवी अश्या कामासाठी असे आव्हान केले .
किशोर सोनवणे यांनी सदर घटनेचा निषेध व्यक्त करत आपले जाहीर पाठिंबा आहे असे मत व्यक्त केलं नानासाहेब शिंदे यांनी काँग्रेस पक्ष अश्या घटना कधी सहन करणार नाही दोषींवर सरकारने लवकरच निर्णय घ्यावा असे सांगितले . समीर देशमुख यांनी आजच्या या निवेदन साठी मी आमच्या आय काँग्रेस च्या वतीने जाहीर पाठिंबा देतो . भाऊसाहेब आहिरे यांनी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आपले समर्थन व्यक्त केले महिंद्र पगारे यांनी आपल्या भाषणात जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर बशिर पठाण शेरू भाई मोमीन यांचे ही भाषण झाले या वेळी महिलांनीही आपले सहभाग नोंदवला तहसीलदार यांना निवेदन महिलांच्या हस्ते देण्यात आले याप्रसंगी सर्व उपस्तिथानी घडलेल्या घटनेचे निषेध व्यक्त केले  याप्रसंगी अडव्होकेट साजिद शेख शकिर शेख जावेद मोमीन हमजा मन्सूरी अजीज शेख फारुख शेख भानुदास पठारे संदिप जोंधळे रेखाताई साबळे रश्मी ताई पालवे आफरिन शेख इशरत खान कविता माळी दयानंद जाधव बखतीयार शेख फरीद खान   सूत्र संचालन व नियोजन अजहर शाह यांनी केले
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity