ताज्या घडामोडी :

.

.
Home » » नासिक जिल्हा मध्यवर्ती बॅन्केने शेतकर्‍यांच्या जमिनींचे लिलाव थांबविण्याचे जिल्हाधिका-यांचे आश्वासन!शेतकरी संघटना

नासिक जिल्हा मध्यवर्ती बॅन्केने शेतकर्‍यांच्या जमिनींचे लिलाव थांबविण्याचे जिल्हाधिका-यांचे आश्वासन!शेतकरी संघटना

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, १७ जुलै, २०१९ | बुधवार, जुलै १७, २०१९

नासिक जिल्हा मध्यवर्ती बॅन्केने शेतकर्‍यांच्या जमिनींचे लिलाव थांबविण्याचे जिल्हाधिका-यांचे आश्वासन!शेतकरी संघटना 
येवला - प्रतिनिधी
शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने  जिल्ह्यातील शेतकर्‍यांना नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जमिनीच्या फेर लिलावाच्या नोटीसा काढल्याचे
निवेदन देऊन शेतजमीनीचे लिलाव होऊ देऊ नये या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी पाटील यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन   स्वीकारतांना जिल्हा बँकेने लिलाव करू नये 
आसे आदेश काढल्याचे सांगितले त्यावर शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी 30 जुलैला फेर लिलाव
काढण्याच्या नोटीसा दाखविल्या त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी लिलाव थांबविण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले.अशी माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे, संतु पाटील झांबरे यांनी दिली. 
     निवेदनाचा आशय असा कि जून महिन्यात नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बॅन्कने थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव करण्याची नोटीस बजावून जमिन लिलावाची प्रक्रिया सुरू केली होती परंतु शेतकरी संघटनांनी विरोध करत लिलाव प्रक्रिया हाणून पाडली.
    गेल्या दोन चार वर्षापासुन गारपीट, कधी अतिवृष्टी, दुष्काळ, शेतमालाचे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे पडलेले भाव,शासनाचे आयात निर्यातीचे धरसोडीचे धोरण  फसवी कर्जमुक्ती अशा  कारणांमुळे शेतकरी अर्थिक कोंडीत सापडला आहे दुस-या बाजूला खते, बियाणे, कीटक नाशके यांच्या भरमसाठ वाढलेल्या किमंती यामुळे शेती कशी करावी अशा विवंचनेत शेतकरी सापडला असताना शेतजमीनीचे लिलाव झाल्यास शेतकऱ्यांना आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय राहणारनाही याची शासनाने त्वरित दखल घेऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून शेती करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना भेटून शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्यात येणार असल्याचे निवेदन दिल्या नंतर झालेल्या शेतकरी संघटनेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. 
शेतकऱ्यांच्या जमिनीचे कोणत्याही परिस्थितीत लिलाव होऊ दिले जाणार नाही गावातील शेतकरी एकत्र येऊन लिलाव करणाऱ्या अधिकाऱ्यांना परत पाठवतील आणि होणाऱ्या परिणामाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जबाबदार राहील असा ईशारा देण्यात आला.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity