ताज्या घडामोडी :

.

.
Home » » समीर समदडीया यांची सोलापूर मध्य रेल्वेच्या विभागीय समिती सदस्यपदी नियुक्ती

समीर समदडीया यांची सोलापूर मध्य रेल्वेच्या विभागीय समिती सदस्यपदी नियुक्ती

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ११ एप्रिल, २०२२ | सोमवार, एप्रिल ११, २०२२

समीर समदडीया यांची सोलापूर मध्य रेल्वेच्या विभागीय समिती सदस्यपदी नियुक्ती

येवला : पुढारी वृत्तसेवा

भाजपा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष समीर समदडीया यांची सोलापूर मध्य रेल्वेच्या विभागीय समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून सोलापूर ते येवल्यापर्यतच्या विविध समस्यां मांडून त्यांची सोडवणूक करण्याचे काम समदडीया यांना करता येणार आहे.
भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाद्वारा रेल्वे विभागीय समिती पुनर्गठन कार्यक्रम अंतर्गत भारत सरकारच्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांच्या शिफारशी वरून हि नियुक्ती करण्यात आली आहे. समदडीया हे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक असून विविध राजकीय व सामाजिक घडामोडीत त्यांचा मोलाचा सहभाग असतो.सोलापूर रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक  प्रदीप हिरडे यांनी नुकतेच समदडीया यांना निवडीचे पत्र दिले.येवल्यासह या भागातील रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण,दौंड-पुणे कॉडलाइन,दौंड- मनमाड मार्गाचे विद्युतीकरण,विविध गाड्यांना नगरमध्ये थांबा मिळवून देणे, स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, प्रवाशांना विविध सोयी सुविधा मिळवून देणे, शिर्डी येथे भारतभरातून साईभक्त दर्शनासाठी येत असल्याने या ठिकाणी येणार्या यात्रेकरूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,कांदा व पैठणीची बाजारपेठ असल्याने महाराष्ट्र एक्स्प्रेस, पुणे जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस तसेच साईनगर शिर्डी दादर एक्स्प्रेसला येथे थांबा मिळावा आदि कामांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे समदडीया यांनी सांगितले. 
समदडीया यांचे या नियुक्तीबद्दल केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार,माजी पालकमंत्री गिरीश महाजन,भाजपाचे संगठन महामंत्री रवि अनासपुरे,जिल्हाध्यक्ष केदा आहेर,जिल्हा संगठन महामंत्री  प्रा.सुनील बच्छाव,डी.के.जगताप,प्रकाश दायमा,जिल्हा महामंत्री नंदकुमार खैरनार, जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल यांनी अभिनंदन केले.आज निवडीची घोषणा होताच येथे शिंदे पाटील फौंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक गणेश शिंदे,माजी नगराध्यक्ष बंडू शिरसागर, भाजपा शहराध्यक्ष तरंग गुजराथी, युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष मयूर मेघराज,ओबीसी मोर्चा सरचिटणीस राजूसिंग परदेशी, सरचिटणीस बापू गाडेकर यांनी पेठा भरवत त्यांचा सत्कार केला. 

"विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर नेहमीच आवाज उठवला असून विविध सामाजिक कामांसाठी नेहमीच पाठपुरावा करत आलो.या कामाची दखल झाली असून माजी पालकमंत्री गिरीश महाजन व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यामुळे मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.या भागातील रेल्वे प्रवाशांचे अनेक प्रश्न असून ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन."
-समीर समदडीया,सदस्य,सोलापूर मध्य रेल्वेच्या विभागीय समिती
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity