ताज्या घडामोडी :

.

.
Home » » गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर येवला व अंदरसुल बाजार समितीत कांदा लिलावाचा शुभारंभ

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर येवला व अंदरसुल बाजार समितीत कांदा लिलावाचा शुभारंभ

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, ३ एप्रिल, २०२२ | रविवार, एप्रिल ०३, २०२२

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर येवला व अंदरसुल बाजार समितीत कांदा लिलावाचा शुभारंभ
नव्या उन्हाळ कांद्याला ९५० रुपयापर्यत तर लालला ७६१ रुपये भाव


येवला : पुढारी वृत्तसेवा

कृषि बाजार समितीच्या येवला व अंदरसुल आवारात नव्या हंगामासाठी कांदा खरेदीचा आजपासून शुभारंभ करण्यात आला.आज उन्हाळ कांद्याला ९५० रुपयापर्यत भाव
नव्या कांदा हंगामासाठी पालकमंत्री छनग भुजबळ यांच्या सुचनेवरुन शेतकरी बांधवांची गैरसोय टाळण्यासाठी कांदा खरेदीदार व्यापाऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या सहकार्याने कांदा लिलावाचा शुभारंभ प्रथमच गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर करण्यात आला.येवला मुख्य आवारात बाजार समितीचे मुख्य प्रशासक वसंतराव पवार यांचे हस्ते तर उपबाजार अंदरसुल येथे प्रशासक किसन धनगे व मकरंद सोनवणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आला. 
आज मुख्य आवारात २२६ ट्रॅक्टर,रिक्षा व पिकअप यानवाहनातून सुमारे ५ हजार क्विटल कांदा विक्रीस आला होता.लाल कांद्याचे बाजारभाव १५० ते ७६१ तर सरासरी ६५० व उन्हाळ कांद्याचे बाजारभाव २५० ते ९५० तर सरासरी ८०० रुपये प्रति क्विटल प्रमाणे होते.
त्याचप्रमाणे उपबाजार अंदरसुल आवारावर २५० ट्रॅक्टर,रिक्षा, व पिकअप मधून सुमारे ५ हजार क्विटल कांदा विक्रीस आला होता.लाल कांद्याचे बाजारभाव २०० ते ६५० तर सरासरी ५५० व उन्हाळ कांद्याचे बाजारभाव ४०० ते ९०० तर सरासरी ८०० रुपये प्रति क्विटल रुपयांपर्यत होते. 
शुभारंभप्रसंगी मुख्य आवारात प्रशासक भानुदास जााव,नंदुशेठ आट्टल,खरेदीदार व्यापारी संतोष आट्टल,सुमित समदडीया, मनोज समदडीया,भुषण समदडीया, अमोल सोनी,सुरेंद्र वडे,लक्ष्मण सोनवणे, विनोद ठाकूर,हर्षद शेख,अल्ताफ शेख, सारी शेख,बाजार समितीचे सचिव के. आर.व्यापारे,लेखापाल बी.ए.आहेर, सिदेश्वर जाधव,बाळासाहेब गायकवाड, गंगाार आहेर,संतोष परदेशी,सुरेश चौरे, अनिल कांगणे,पोपट निसाळ,जगन पवार,दिलीप आरखडे,दत्तु टोंगार आदी उपस्थित होते.तर उपबाजार अंदरसुल येथे खरेदीदार व्यापारी सुरेश आट्टल, संजय माळी,सचिन पौठणकर,अतुल गाडे,नितीन देशमुख,अशोक एंडाईत, संतोष सोनवणे,निवृत्ती ढोले,शिवाजी ढोले,संजय सैंद्रे,बाळनाथ धुमाळ,सागर धुमाळ,दत्तु सोनवणे तसेच रविंद्र बोडखे, संजय मोरे,रोहिदास पठाडे,शरद बत्तीसे, साईनाथ फुलारे,केदारनाथ पोळ आदी उपस्थित होते.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity