ताज्या घडामोडी :

.

.
Home » » मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवल्यातील धुळगाव व १७ गावे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेस शासनाची मान्यता

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवल्यातील धुळगाव व १७ गावे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेस शासनाची मान्यता

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, ४ मे, २०२२ | बुधवार, मे ०४, २०२२







मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवल्यातील धुळगाव व १७ गावे

प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेस शासनाची मान्यता

 

 

येवल्यातील धुळगाव व १७ गावे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेसाठी

७२.५९ कोटी रुपये निधीस मंजुरी

 

 

येवला : पुढारी वृत्तसेवा

राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून जल जीवन मिशन कार्यक्रमांअंतर्गत येवला तालुक्यातील धुळगाव व १७ गावे नळ पाणी पुरवठा  योजनेस शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या योजनेस ७२.५९ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन या योजनेचे काम सुरु होणार आहे.

 

सतत दुष्काळाच्या छायेत असलेल्या येवला तालुक्याला टंकरमुक्त करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. यासाठी येवला तालुक्यात विविध पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत असून येवला तालुका हा दुष्काळमुक्तीच्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल करत आहे.  येवला तालुक्यातील अडतीसगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर इतर गावे जोडल्यामुळे या योजनेवर अतिरिक्त भार निर्माण झालेला आहे. या योजनेतील काही गावांचा समावेश धुळगांव व इतर १७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत करण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या होत्या. त्यानंतर सदर योजनेचा तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेला होत्या.

 

त्यानुसार योजनेचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली असून यासाठी ७२ कोटी ५९ लक्ष रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे.  या योजनेच्या मंजुरीमुळे येवला तालुक्यातील धुळगाव व १७ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट असलेल्या धुळगाव, पिंपळगाव लेप, एरंडगाव खु., एरंडगाव बु., जळगाव नेऊर, नेऊरगांव, देशमाने बु., मानोरी बु., शिरसगाव लौकी, सतारे, भिंगारे, पुरणगाव, मुखेड, जऊळके, चिचोंडी बु., चिचोंडी खु.,सताळी, बदापूर या गांवाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.

         

राजापूरसह ४१ गावे पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावास सुधारित प्रशासकीय मान्यता

राजापूरसह ४१ गाव पाणी पुरवठा योजनेस शासनाकडून १८८.३१ कोटी निधी मंजूर

 

येवला तालुक्यातील राजापूरसह ४१ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली असून यासाठी शासनाकडून याआधीच १६२ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आले आहे. नवीन दरसूची मुळे या योजनेच्या खर्चात अधिक वाढ होत असल्याने शासनाकडे पुन्हा सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावास शासनाची मान्यता मिळाली असून यासाठी १८८.३१ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे.

 

सदर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमध्ये तालुक्यातील राजापूर, ममदापूर, रेंडाळे, अंगुलगाव, डोंगरगाव, देवदरी, खरवंडी, रहाडी, पिंपळखुटे तिसरे, पन्हाळसाठे, वाघाळे, आहेरवाडी, कोळम खुर्द, पांजरवाडी, जायदरे, हडपसावरगाव, वाईबोथी, खामगाव, देवठाण, गारखेडा, भुलेगाव, मातुलठाण, कौटखेडे, आडसुरेगाव, धामणगाव, लहीत, गोरखनगर, वसंतनगर, चांदगाव, भायखेडा, कोळम बु, कोळगाव, कूसमाडी, नायगव्हाण, खिर्डीसाठे, महालगाव सह घना माळी मळा,गणेशपूर, कासारखेडे, दुगलगाव व बोकटे या ४१ अवर्षणप्रवण क्षेत्रातील गावांचा समावेश आहे. पन्हाळसाठे येथून ग्रॅव्हीटीद्वारे सर्व गावांना पाणीपुरवठा होणार आहे.

Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity