ताज्या घडामोडी :

.

.
Home » » छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला शहरातील नागरी सेवा व सुविधांसाठी १० कोटींचा निधी मंजूर

छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला शहरातील नागरी सेवा व सुविधांसाठी १० कोटींचा निधी मंजूर

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, ३० जून, २०२२ | गुरुवार, जून ३०, २०२२

छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला शहरातील नागरी सेवा व सुविधांसाठी १० कोटींचा निधी मंजूर

येवला : पुढारी वृत्तसेवा
छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला शहरात नागरी सेवा व सुविधांच्या विविध १३ विकास कामांसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.या माध्यमातून रस्ता काँक्रीटीकरण, भूमिगत गटार, वाणिज्य संकुल यासह विविध नागरी सेवा व सुविधांची विकासकामे करण्यात येणार आहे.


नागरी सेवा व सुविधांच्या या कामांमध्ये येवला शहरातील लक्ष्मीआई मंदिर ते नागड दरवाजा रोड-नांदगाव रोड पावेतो रस्त्या डांबरीकरण व कॉक्रीटीकरण करणे व अनुषंगिक गटार बांधकाम करण्यासाठी ७० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच नाशिक महामार्ग विंचूर रोड पाणी टाकी ते पारेगाव रस्त्या पावेतो रस्ता कॉक्रीटीकरण करणे व अनुषंगिक कामे करण्यासाठी १ कोटी ८० लक्ष, डॉ . बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर समोर भूमिगत गटार करण्यासाठी २० लक्ष, पारेगाव रोड भागात भूमिगत गटार बांधकाम करणे व अनुषंगिक रस्ता कॉक्रीटीकरण करण्यासाठी ५० लक्ष, कै. भाऊलाल पहिलवान लोणारी व्यापारी संकुल परिसरातील रस्ता कॉक्रीटीकरण करणे व भूमिगत गटार बांधकाम करण्यासाठी ५० लक्ष, जुनी नगर परिषद रस्ता ते म.रा.वि.मं कंपनी ऑफिस ते सुंदर नगर पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे व भूमिगत गटार बांधकाम करण्यासाठी १५ लक्ष, येवला शहरातील २४.०० मीटर रुंद रस्त्यालगत डॉ . साळुंखे हॉस्पिटल ते श्री . गाडेकर यांचेघर ते कलावती आई मंदिरापर्यंत जोडणाऱ्या रस्त्यापर्यंत कॉक्रीटीकरण करणे व भूमिगतगटार बांधकाम करण्यासाठी ३५ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आले आहे.


त्याचबरोबर येवला शहरातील सोमनाथ गुंड ते जगदाळे वस्ती पावेतो रस्ता कॉक्रीटीकरण करणे व भूमिगत गटार बांधकाम करण्यासाठी १० लक्ष, गवंडी गल्ली भागात रस्ता कॉक्रीटीकरण करणे व भूमिगत गटार बांधकाम करण्यासाठी २० लक्ष, हमाल गल्ली भागात रस्ता काँक्रीटीकरण करणे व भूमिगत गटार करण्यासाठी २० लक्ष, म्हसोबा नगर स. नं. १४ पैकी मधील रस्ता कॉक्रीटीकरण करणे व भूमिगतगटार बांधकाम करण्यासाठी १५ लक्ष, जाईचा मारुती तालीम ते संभाजी जेजुरकर यांचे घरापर्यत रस्ता कॉक्रीटीकरण करणे व भूमिगत गटार बांधकाम करण्यासाठी १५ लक्ष, *जुनी नगरपालिका इमारत सिटी सर्व्हे क्र . ४५३६ ते ४५४२ येथे वाणिज्य संकुल बांधणे तसेच इतिहास संग्रहालय व अनुषंगिक कामे करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी* मंजूर करण्यात आला आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity