ताज्या घडामोडी :

.

.
Home » » सावरगाव विद्यालयात रंगली विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक! अर्ज,प्रचार,मतदान या प्रक्रिया हुबेहब राबवित विद्यार्थ्यांना दिला मतदानाचा अनुभव

सावरगाव विद्यालयात रंगली विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक! अर्ज,प्रचार,मतदान या प्रक्रिया हुबेहब राबवित विद्यार्थ्यांना दिला मतदानाचा अनुभव

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, २१ जुलै, २०२२ | गुरुवार, जुलै २१, २०२२

सावरगाव विद्यालयात रंगली विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक!
अर्ज,प्रचार,मतदान या प्रक्रिया हुबेहब राबवित विद्यार्थ्यांना दिला मतदानाचा अनुभव

येवला : पुढारी वृत्तसेवा

अनेक संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया कशी असते हे अनेकांना आजही उमजत नाही...शालेय अभ्यासक्रमात निवडणुका व राजकारणाचा अभ्यास करताना त्यांना ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावी या हेतूने 
सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व एम.जी. पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात आज विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक पार पडली. हुबेहूब निवडणुकीचा कार्यक्रम राबवून ही सगळी प्रक्रिया पार पडल्याने विद्यार्थी आनंदाने व उत्साहाने या सगळ्या प्रक्रियेत रममान झाले होते.
शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी प्रमोददादा पाटील,सहसचिव प्रवीणदादा पाटील, माजी सभापती संभाजीराजे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य शरद ढोमसे यांच्या संकल्पनेतून विद्यालयात विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडीची संपूर्ण प्रक्रिया पार पडली.विद्यार्थी उमेदवार,मतदारानी अतिशय चुरशीच्या वातावरणात या निवडणुकीत सहभागी होऊन आनंद लुटला.सोमवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येऊन इच्छुक उमेदवारांना मंगळवारपर्यंत आपले नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची संधी देण्यात आली होती.मंगळवारी दाखल अर्जांची छाननी होऊन चिन्ह वाटप करण्यात आले तर मंगळवार व बुधवार हे दोन दिवस विद्यार्थ्यांना प्रचारासाठी देण्यात आले होते.आठ मंत्री पदासाठी ३० उमेदवार रिंगणात होते.पाचवी ते बारावीच्या सर्व वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना आपल्या चिन्हांसह स्वतःची ओळख करून देत विद्यार्थ्यांसाठी केल्या जाणाऱ्या कामाची माहिती देऊन मतदान करण्याचे आवाहन केले.
आज गुरुवारी सकाळी विद्यालयात दोन मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पार पडली.यासाठी मतदान केंद्र,बॅलेट पेपर बनविण्यात आले होते.मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.मतदान केंद्रात विद्यार्थ्यांचे ओळखपत्र पाहिले गेले.वर्गनिहाय मतदार याद्या बनवून त्यावर स्वाक्षरी घेतानाच हाताच्या बोटाला शाही लावून मग विद्यार्थ्यांना बॅलेट पेपर देऊन मतदानाचा हक्क बजविण्याची संधी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी देखील अतिशय आनंदाने सहभागी होत संपूर्ण प्रक्रिया समजावून घेतली.विशेष म्हणजे प्रचारासह मतदानाचा मनमुराद आनंद विद्यार्थ्यांनी लुटला.मतदान प्रक्रिया झाल्यानंतर सर्व शिक्षक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणी देखील करण्यात आली.
प्राचार्य शरद ढोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पोपट भाटे,झोनल अधिकारी संतोष विंचू,सहायक अधिकारी ऋषी काटे यांनी काम पाहिले तर मतदान केंद्राध्यक्ष म्हणून उमाकांत आहेर व श्रीमती राजकुवर परदेशी यांनी,मतदान अधिकारी म्हणून सगुना काळे,भाग्यश्री सोनवणे,उज्वला तळेकर,रोहिणी भोरकडे,सविता पवार,अर्चना शिंदे यांनी जवाबदारी पार पाडली.जेष्ठ शिक्षक गजानन नागरे,यशवंत दराडे,वसंत विंचू,योगेश भालेराव,नामदेव पवार,
योगेश पवार,कैलाश मोरे,रविंद्र दाभाडे,संजय बहिरम,लक्ष्मण माळी,मयूर पैठणकर,प्रमोद दाणे,विकास व्यापारे,
रोहित गरुड,निलेश व्हनमाने, आकाश नागपुरे,सागर मुंढे,मच्छिंद्र बोडके,लक्ष्मण सांगळे आदींनी नियोजन केले.
● असा लागला निकाल
अतिशय चुरशीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया झाल्याने मतमोजणीत चुरस दिसली.अगदी पाच ते दहा मतांनी निकाल लागला गेला.मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक मते मिळून पायल काटे, उपमुख्यमंत्रीपदी नूतन गोविंद,शिक्षण मंत्रीपदी अर्जुन गोराणे,आरोग्य मंत्रीपदी क्षितिजा राजवाडे,पर्यटन मंत्रीपदी साधना गोविंद,क्रीडामंत्रीपदी अरस्लान सय्यद, स्वच्छता मंत्रीपदी तन्मय पवार तर महिला व बालकल्याण मंत्रीपदी प्रतीक्षा तळेकर यांनी सर्वाधिक मते मिळवत विजय मिळविला.

"निवडणूक व मतदान तसा प्रत्येकाचा आवडीचा विषय..अभ्यासातही याचे काही संदर्भ आहेतच.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निवडणुकीची असलेली उत्सुकता पूर्ण व्हावी,त्यांना संपूर्ण प्रक्रिया समजावी यासाठी हुबेहूब निवडणूक कार्यक्रम व मतदान प्रक्रिया आम्ही राबविली.विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसला शिवाय भविष्यात मतदानाविषयी जागृती देखील त्यांच्यामध्ये झाली."
-शरद ढोमसे,प्राचार्य,न्यू इंग्लिश स्कुल,सावरगाव


Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity