ताज्या घडामोडी :

.

.
Home » » अंकाई किल्ल्यावर अमृत महोत्सव निम्मित हेरिटेज वॉक..

अंकाई किल्ल्यावर अमृत महोत्सव निम्मित हेरिटेज वॉक..

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, ११ ऑगस्ट, २०२२ | गुरुवार, ऑगस्ट ११, २०२२

अंकाई किल्ल्यावर अमृत महोत्सव निम्मित हेरिटेज वॉक..
येवला तहसीलदार हिले व माणुसकी फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम..

येवला : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिलेल्या सैनिकांचे योगदान फार मोलाचे आहे,वीर जवान व स्वातंत्र सैनिकाप्रती कृतज्ञता व सार्थ अभिमान व्यक्त करीत आपण सर्व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करूया असे प्रतिपादन येवला तहसीलदार प्रमोद हिले यांनी केले.अंकाई किल्ला हेरिटेज वॉक चे उदघाटन मशाल पेटवून मनमाड उपविभागीय पोलिस अधिकारी समिरसिह साळवे,तहसीलदार प्रमोद हिले,येवला नगरपालिका मुख्याधिकारी नागेंद्र मूतकेकर,येवला पोलिस निरीक्षक अनिल भवारी, सहायक निबंधक पाडवी व माणुसकी फाउंडेशन चे अध्यक्ष अलकेश कासलीवाल,अंकाई सरपंच सौ नागिना कासलिवाल यांनी केले.
  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने येवला येथील तहसील प्रशासन व माणुसकी फाउंडेशन च्या वतीने ऐतिहासिक पौराणिक अंकाई किल्ल्यावर आज हेरिटेज वॉक चे आयोजन केले. उदघाटन सोहळा अंकाई ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला ,नंतर संपूर्ण गावातून नियोजन बद्ध प्रभातफेरी काढण्यात आली त्यात प्रथम अमृत महोत्सवाचे फलक,  वाजत गाजत अहिल्यादेवी होळकर व प्राथमिक शाळेचे विद्यार्थी हातात तिरंगा झेंडा घेऊन त्यामागे ढोलपथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता त्यापाठोपाठ भारम व जळगाव हुन आलेले पोलिस अकॅडमीचे जवान मोठे झेंडे घेऊन सामील झाले. त्यानंतर ग्रामस्थ व महिला,प्रभातफेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर  मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
 सर्व जण त्याच क्रमाने जैन लेणी येथे मार्गस्थ होत देशभक्तीपर घोषणाबाजीने अक्षरशः परिसर दुमदुमून गेला होता. प्रास्तविक  तहसीलदार हिले यांनी हेरिटेज वॉकचे व अमृत महोत्सवानिमित्त 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक घरावर झेंडा लावावे तसेच घरासमोर रांगोळी काढून सणाप्रमाणे हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन करत येवला वासीयांना शुभेच्छा दिल्या.उपविभागीय पोलीस अधिकारी साळवे,विस्तार अधिकारी यादव,सहायक निबंधक पाडवी,आनंद शिंदे,सचिन दराडे आदींनी मनोगत आपले मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.अंकाई ग्रामपंचायातीच्या वतीने सरपंच सौ कासलीवाल यांनी स्वागत करत सर्व अधिकारी वर्ग व उपस्थित ग्रामस्थाना धन्यवाद देत शुभेच्छा  दिल्या. किल्याची व लेण्यांची माहिती प्राध्यापक भाऊसाहेब गाढे यांनी सूत्रसंचालन केले .आभार प्रदर्शन व कार्यक्रमाच्या आयोजनाचे महत्व  आयोजक माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष अलकेश कासलीवाल यांनी केले.याप्रसंगी नायब तहसीलदार चांदवड कर साहेब,पोलीस उपनिरीक्षक राजपूत ,पोलिस उपनिरीक्षक भिसे ,ग्रा.पं.सदस्य डॉ प्रीतम वैद्य, सागर सोनवणे,संतोष टिटवे,बाळू बोराडे,अशोक बोराडे,वि का सोसायटी चे चेअरमन भास्कर बडे,व्हा चेअरमन चंद्रभान व्यापारे,मुख्याध्यापक दीपक गायकवाड , सयाजी गायकवाड ,नितीन देवकर ,बचत गटाच्या महिला सदस्य उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी अहिल्याबाई होळकर विद्यालयाचे,प्राथमिक शाळेचे शिक्षक,ग्रामपंचायत सरपंच,सदस्य,वि का सोसायटी चेअरमन व संचालक ,गावातील सर्व तरुण वर्ग,माणुसकी फाउंडेशन चे सर्व सदस्य,महसूल कर्मचारी, पोलीस पाटील आदींनी परिश्रम घेतले.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity