ताज्या घडामोडी :

.

.
Home » » कॉंग्रेस पक्षातर्फे येवल्यात राजीव गांधी यांचे जयंती निमित्त रक्तदान शिबिरात ५२ रक्ताच्या पिशव्यांचे संकलन.

कॉंग्रेस पक्षातर्फे येवल्यात राजीव गांधी यांचे जयंती निमित्त रक्तदान शिबिरात ५२ रक्ताच्या पिशव्यांचे संकलन.

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, २० ऑगस्ट, २०२२ | शनिवार, ऑगस्ट २०, २०२२

कॉंग्रेस पक्षातर्फे येवल्यात राजीव गांधी यांचे जयंती निमित्त रक्तदान शिबिरात ५२ रक्ताच्या पिशव्यांचे संकलन.

येवला : पुढारी वृत्तसेवा
     येवला तालुका व शहर कॉंग्रेस कमिटी तर्फे भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांचे जयंती निमित्त २० ऑगस्ट २०२२ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, येवला येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरात सामाजिक भावनेतून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सहभाग नोंदवला. यावेळी ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. नवजीवन रक्तपेढी नाशिक यांनी सदर रक्तदात्यांचे रक्त संकलन केले.
     यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे यांचे हस्ते राजीव गांधी यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी तालुकाध्‍यक्ष ॲड. समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, शहर प्रवक्ते नानासाहेब शिंदे, प्रहारचे वसंतराव झांबरे, तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, तालुका कार्याध्यक्ष भाऊराव दाभाडे, प्रमोद पाटील, उमेश कंदलकर, समीर शेख, तालुका संघटक अण्णासाहेब पवार, दयानंद बेंडके, नितीन सोनवणे,दत्तू भोरकडे, डॉ. दिगंबर गायकवाड, राजेंद्र गणोरे, नवनाथ उंडे, शिवाजी साताळकर, गणेश शिंदे, अजित पवार, डॉ. नीलम पटणी, बापूसाहेब खटाणे, बाळासाहेब मढवई, सोमोदय मढवई, अक्षय शिंदे, प्रवीण राजगुरू, शिवाजी निमसे, दत्तात्रय कोटमे, विजय मढवई, शरद कोकाटे,  कैलास भोरकडे, सुभाष वाघीरे, शरद जोशी, रविंद्र गरूड, गोपीनाथ पवार, नंदीनी पवार, अमोल सोनी, दीपक जाधव, ऋषिकेश गायकवाड, बाबुलाल पडवळ, नवनाथ लभडे, डाॅ. पार्श्व पटणी, अप्पासाहेब काळे, कार्तिक बनकर, विठ्ठल वाळके, मुजहीद खान, बाबासाहेब दारूंटे, गोरख मढवई, प्रमोद घोटेकर, अमित गणोरे, रितेश थोरात, आश्विनी पटणी, राहुल पवार, प्रियल पटणी, ऋषिकेश आरखडे, राकेश सासे, नमीक्षव पटणी, गोपाल यादव रक्तदात्यांनी रक्तदान केले.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity