ताज्या घडामोडी :

.

.
Home » » यज्ञ सुरू असतानाच भगवान शंकराच्या मूर्तीवर अवतरले नागराज

यज्ञ सुरू असतानाच भगवान शंकराच्या मूर्तीवर अवतरले नागराज

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२ | सोमवार, ऑक्टोबर १७, २०२२

 यज्ञ सुरू असतानाच भगवान शंकराच्या मूर्तीवर अवतरले नागराज

येवला : पुढारी वृत्तसेवा

येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात सोमवारी  कालाष्टमीनिमित्त भाविकांच्या वतीने यज्ञ सुरू होता.  दरम्यान हा यज्ञ सुरू असताना एक चमत्कारिक घटना घडली . 
भगवान भोले शंकराच्या मूर्तीवर नागराज अवतरले अन या नागराजांनी भगवान शंकराच्या गळ्याला वेडा देऊन तेथे ठाण मांडले. 
हा सर्व चमत्कार येथील भाविकांनी पाहिल्यानंतर भाविकांनी  कुठलाही आरडाओरडा न करता सर्पमित्राला याबाबत माहिती दिली.  सर्पमित्र दीपक सोनवणे यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन या नागराजाला सुरक्षित रित्या जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले . दरम्यान या घटनेची चर्चा परिसरात होताच नागरिकांनी मंदिराच्या दिशेने धाव घेऊन दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाला आहे .
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity