ताज्या घडामोडी :

.

.
Home » » आदिती पटेल,वैश्ववी पटेल,माया टोणपे दिवाळीच्या रांगोळी स्पर्धेच्या ठरल्या विजेत्या येवल्यात कुणाल दराडे फाऊंडेशनकडून विजेत्यांचा गौरव

आदिती पटेल,वैश्ववी पटेल,माया टोणपे दिवाळीच्या रांगोळी स्पर्धेच्या ठरल्या विजेत्या येवल्यात कुणाल दराडे फाऊंडेशनकडून विजेत्यांचा गौरव

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२ | शुक्रवार, नोव्हेंबर ०४, २०२२

आदिती पटेल,वैश्ववी पटेल,माया टोणपे दिवाळीच्या रांगोळी स्पर्धेच्या ठरल्या विजेत्या
येवल्यात कुणाल दराडे फाऊंडेशनकडून विजेत्यांचा गौरव 

येवला :  प्रतिनिधी

एक से बढकर एक रांगोळीच्या अदाकारीने दारापुढील रांगोळी स्पर्धेत १८० महिलांनी हिरीरीने आपला सहभाग नोंदवल्याने दिवाळीत चुरशीच्या व दिमाखात झालेल्या कुणाल दराडे फाऊंडेशनच्या भव्य रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वीतरण समारंभ पार पडला.वेगवेगळ्या गटात आदिती पटेल,वैश्ववी पटेल,माया टोणपे
यांनी प्रथम क्रमांक मिळवला. बुधवारी मर्चंट बँकेच्या सभागृहात स्पर्धेचा भव्य-दिव्य पारितोषिक वितरण संमारभ पार पडला.यावेळी फाऊंडेशनकडून ३१ बक्षीसे देऊन महिलांचा गौरव करण्यात आला.
कुणाल दराडे फौंडेशनच्या वतीने दिवाळी निमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेत महिला,युवतीनी हिरीरीने आपला सहभाग नोंदवला.विविध रंगांच्या रांगोळ्यातुन उत्कृष्ट कलाविष्कार साधत महिलानी एकाग्रतेने पाच-सात तास घालवून मग्न होत हे रेखाटन साकारले होते.टिपक्यांची रांगोळी,संस्कार भारती आणि विषयाचे बंधन नसलेल्या अशा रांगोळ्या काढत १८० महिलांनी सहभाग नोंदवला.विशेष म्हणजे मुलीसह पुरुषांनी देखील देखण्या रांगोळ्या काढल्या.
विविध रंगांच्या रांगोळ्यातुन उत्कृष्ट कलाविष्कार साधत महिलानी एकाग्रतेने पाच-सात तास घालवून मग्न होत हे काढलेल्या रांगोळ्या पाहत राहव्या अशा होत्या. शिवाजी महाराज,अयोध्यात साकारत असलेले श्रीराम मंदिर,देखण्या पैठणी,कोरोना वारियर्स,सिंधूताई सपकाळ,स्वच्छ भारत अशा अनेक सुंदरशा रांगोळ्यांनी लक्ष वेधले याशिवाय मातृप्रेम,पाणे-फुले,धार्मिक प्रसंग,पशु-पक्षी,व्यक्तीचित्रे,निसर्ग चित्रे,बेटी बचाव,थ्रीडी अशा विविध विषयावरील रेखाटलेल्या रांगोळ्या नजरेत भरणाऱ्या होत्या.रांगोळ्यांच सौदर्य खुलविण्यासाठी आकर्षक रोषणाई तर काही ठिकाणी मंजुळ सुरात ध्वनीफीत लावलेली दिसत होती.प्रत्यक्ष रांगोळ्या पाहिल्यावर त्या इतक्या सुंदर व त्यावर घेतलेली मेहनत पाहिल्यावर परिक्षकांची चांगलीच कसरत झाली.विशेष म्हणजे सायंकाळी सात वाजता सुरू झालेले परीक्षण रात्री बारा वाजेपर्यंत सुरू होते.
ब्रम्हकुमारी नीतादीदी यांची प्रमुख उपस्थिती होती.परीक्षक संगीता पटेल,ज्योती खंदारे,अंकिता मानेकर,तृप्ती परदेशी,श्रीकांत खंदारे,राकेश तडवी आदींच्या हस्ते या पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.विजेत्या भगिनींना तीन गटात प्रथम ३००१, द्वितीय २००१,तृतीय १००१ चतुर्थ ७०१ तसेच उत्तेजनार्थ ५०१ असे तब्बल ३१ बक्षिसे यावेळी देऊन गौरविण्यात आले.तर सहभागी प्रत्येक महिलेला प्रतिमा व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.महिला भगिनींचा उत्साहाने कार्यक्रमात अधिकच रंगत आली.शहराची सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी फाउंडेशन दरवर्षी स्पर्धा आयोजित करणार आहे.यावेळी शहरातील भगिनींनी दिलेल्या प्रतिसादाची प्रशंसा करत पुढील वर्षी भव्य स्वरूपात स्पर्धा आयोजित करण्याचा मानस यावेळी बोलताना कुणाल दराडे यांनी व्यक्त केला.संतोष विंचू यांनी सूत्रसंचालन केले.फाऊन्डेशनचे कल्पेश पटेल,दीपक गुप्ता,विजय गोसावी,आत्मेश विखे,इम्रान शेख,
मोहफिज अत्तार,मंदार पटेल,गौरव पटेल,सुनील काटवे,अक्षय राजपूत, मयुर वाळूंज,योगेश लचके,संजय गायकवाड,नचिकेत जाधव,प्रशांत जाधव, सिद्धार्थ धिवर आदींनी नियोजन केले.
● या महिला झाल्या विजेत्या...
★हस्तकला गट : प्रथम - आदिती पटेल,द्वितीय - अमृता गुजराथी,तृतीय - दर्शना परदेशी,चतुर्थ - श्रुष्टी पटेल.उत्तेजनार्थ - भूमी कासार,सेजल असार,ज्योती कुक्कर,पल्लवी वाणी,प्रणाली शिंदे, ऋतुजा विखे,अनामिका कायस्थ,दीपाश्री पावटेकर,श्रद्धा काबरा,ज्योती कोदे,जय भवानी मित्र मंडळ
★टिपक्यांची रांगोळी गट : प्रथम - वैष्णवी पटेल,द्वितीय - सिद्दी कासार,तृतीय - तनया कंदलकर, चतुर्थ - तेजस्वीनी कुक्कर.
★संस्कार भारती : प्रथम - माया टोनपे,द्वितीय - स्नेहल मगर,तृतीय - कोमल राजपूत,चतुर्थ -श्रद्धा राजपूत. उत्तेजनार्थ - विद्या लुटे,दर्शना जैन
 ★बाल गट :  भक्ती करंजकर,रेणुका कुंभकर्ण,रोशनी परदेशी,वैभवी माळवे,श्रेया परदेशी
★ ग्रुप - नया पर्व ग्रुप

येवला : रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांसह कुणाल दराडे,ब्रम्हकुमारी निता दीदी व परीक्षक
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity