ताज्या घडामोडी :

.

.
Home » » महसूल प्रशासनाने दाखवली तत्परता.... सामंजस्यातून मोकळा झाला दोन जिल्ह्यांचा शिव रस्ता

महसूल प्रशासनाने दाखवली तत्परता.... सामंजस्यातून मोकळा झाला दोन जिल्ह्यांचा शिव रस्ता

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, ७ डिसेंबर, २०२२ | बुधवार, डिसेंबर ०७, २०२२

महसूल प्रशासनाने दाखवली तत्परता....
सामंजस्यातून मोकळा झाला दोन जिल्ह्यांचा शिव रस्ता

येवला : पुढारी वृत्तसेवा

 मौजे निमगाव मढ तालुका येवला जिल्हा नाशिक व मौजे रवंदे तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर या दोन जिल्ह्यांच्या  सीमेवरील शिवरस्ता सुमारे वीस वर्षापासून अतिक्रमित झाला होता. 
येवला तालुक्यातील विधवा महिला मंगलाबाई वाळू(बाळू) दिवटे यांनी येवल्याचे तहसीलदार प्रमोद हिले यांच्याकडे सुमारे पंधरा दिवसांपूर्वी आपल्या शेतात ऊस असून हे पीक रस्त्या अभावी तोडणी करून कारखान्याला पाठवता येत नाही, असा तक्रार वजा विनंती अर्ज दाखल केला होता. निमगाव मढ येथील विधवा महिलेचे सासरे माजी सैनिक असल्याने त्यांना शासनाकडून चार एकर जमीन मिळाली होती. परंतु या सैनिकाचे व महिलेच्या पतीचे अकाली निधन झाल्याने व महिला दिव्यांग असल्याने स्वतःला शेती करता येत नव्हती. आतापर्यंत ही शेती निमबटाईने करत होते. मागील वर्षी या महिलेचा मुलगा व महिलेने स्वतः ही शेती करण्याचा निर्णय घेतला. शेतात उसाचे पीक घेतले. मात्र तोडणीला आलेला ऊस तोडून शेताबाहेर घेऊन जाण्यासाठी रस्ताच नाही तर कसे करणार? प्रश्न निर्माण झाला. कारण शिवरस्ता फक्त एक फुटाचा राहिला होता. या अर्जाची दखल घेऊन दिनांक 24 नोव्हेंबर 2022  रोजी स्थळ निरीक्षण करून शिवरस्त्याच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले. त्या अनुषंगाने, 6 डिसेंबर 2022 रोजी शिवरस्ता मोकळा करण्याची तारीख निश्चित करण्यात आली. दोन्ही तालुक्यातील प्रकाश शिरोडे ,रमेश शिरोडे,महंमद तांबोळी,अहमद तांबोळी, शेतकऱ्यांच्या समन्वयाने त्यांच्याशी संवाद साधून येवल्याचे तहसीलदार प्रमोद हिले, तलाठी अश्विनी भोसले,उपसरपंच लबडे व गावातील नागरिक यांच्या मध्यस्थीने  एक फुटाचा असलेला शिवरस्ता 12 फूट मोकळा करण्यात आला. लोकसहभागातून या रस्त्यावर खाली विहिरीवरील दगडाचा थर व त्यानंतर त्यावर मुरूम टाकून कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे.निमगाव मढ-रवंदा शिवरस्ता खुला करण्यासाठी तहसीलदार प्रमोद हिले यांच्यासह अर्जदार मंगलाबाई दिवटे ,अक्षय दिवटे तसेच आजूबाजूचे शेतकरी रमेश शिरोडे, प्रकाश शिरोडे, महंमद तांबोळी, अहमद तांबोळी,मंडळ अधिकारी प्रदीप मोठे, तलाठी मनीषा इगवे, कोतवाल नंदू दिवटे,पोलीस पाटील केशव लबडे, उपसरपंच जितेंद्र लबडे, छगन दिवटे, माजी सैनिक रभाजी दवंगे, जेसीबी चालक प्रवीण लबडे यांनी सहकार्य केले.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity