ताज्या घडामोडी :

.

.
Home » » विद्यार्थी स्वयंसेवकाकडून स्वच्छता अभियानासह जनजागृतीसाठी पुढाकार

विद्यार्थी स्वयंसेवकाकडून स्वच्छता अभियानासह जनजागृतीसाठी पुढाकार

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, २३ जानेवारी, २०२३ | सोमवार, जानेवारी २३, २०२३

विद्यार्थी स्वयंसेवकाकडून स्वच्छता अभियानासह जनजागृतीसाठी पुढाकार
एस.एन.डी.अभियांत्रिकी व फार्मसी महाविद्यालयाचे रासेयोचे शिबिराचे उद्घाटन

येवला : पुढारी वृत्तसेवा
बाभूळगाव येथील एस.एन.डी.अभियांत्रिकी महाविद्यालय,  संशोधन केंद्र व एस.एन.डी. औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विशेष राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर बाभूळगाव येथे सुरू झाले.या शिबिरात विद्यार्थ्यांनी आज स्वच्छता अभियान राबविले.
बाभूळगाव येथे सुरू झालेल्या सदर शिबिरात रक्तदान शिबीर,विविध सामाजिक विषयावर चर्चासत्र, जनजागृती रॅली आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यानिमित्ताने स्वयंसेवक विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव जागृती निर्माण करण्यासह विविध विषयांची माहिती देऊन त्यांचे प्रबोधन केले जाणार आहे.
उद्घाटनप्रसंगी बाभूळगाव येथील रासेयो तालुका  समन्वयक प्रा.अक्षय बळे यांनी राष्ट्रीय  सेवा योजनेची माहिती दिली.शिबिराच्या निमित्ताने भावी अभियंते व फार्मासिस्ट यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर,स्मशान भूमी  येथे स्वच्छ्ता करत मोहीम राबवली.
उद्घाटन प्रसंगी सरपंच मिराबाई वाबळे, उपसरपंच शरद बोरणारे,पोलीस पाटील नंदकुमार जगताप,तंटामुक्ती अध्यक्ष विजय साताळकर,मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ.हरजीत पवार,रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.विशाल ठाकरे  व प्रा.व्ही.जी.रोकडे,प्रा.सचिन सावंत,प्रा. स्नेहल बगदाने,प्रा.धनश्री सावकार,
प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे , प्रशासकीय समन्वयक सुनिल पवार, कार्यालयीन अधीक्षक प्रा. दत्तात्रय क्षीरसागर व विद्यार्थी उपस्थित होते. मृणाल शितोळे,दुशिंग नेहा,काजल सोनी यांनी सूत्रसंचालन केले. सदर शिबीरासाठी अभियांत्रिकीच्या ६० तर औषधनिर्माण शास्त्रच्या ३० विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला आहे. अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ डी.एम.यादव व एस.एन.डी.औषधनिर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश
कोलकोटवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर पार पडत आहे.संस्थेचे अध्यक्ष आमदार नरेंद्र दराडे,आमदार किशोर दराडे,सचिव लक्ष्मण दराडे,कार्यकारी संचालक रुपेश दराडे यांनी या शिबिराला शुभेच्छा देऊन उपक्रम राबविण्याच्या सूचना केल्या आहेत.

बाभूळगाव : एस.एन.डी.अभियांत्रिकी व फार्मसी महाविद्यालयाचे रासेयोचे शिबिराचे उद्घाटन प्रसंगी पदाधिकारी.
दुसऱ्या छायाचित्रात स्वच्छता अभियान राबविताना विद्यार्थी.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity