ताज्या घडामोडी :

.

.
Home » » बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, १९ फेब्रुवारी, २०२३ | रविवार, फेब्रुवारी १९, २०२३

बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा..

शिवरायांचे चरित्र आणि चारीत्र्य अभ्यासातून व्यक्तिमत्व विकास साधावा  : प्राचार्य पंकज निकम

येवला : पुढारी वृत्तसेवा

 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती "जय भवानी, जय शिवाजी'' च्या जय घोषात श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अंगणगाव येथील बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बनकर, प्राचार्य पंकज निकम व विद्यार्थ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पुष्पहार अर्पण करत पूजन करण्यात आले.
    शिवरायांच्या वेशभूषेत आलेले पूर्व प्राथमिक विभागातील वरद निकम, वेदांश शिंदे, टायगर सिंग, काव्यांश सिंग, इयत्ता ८ वी तील प्रणव मढवई, इयत्ता तिसरीतील राजवीर टेलोरे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  पूर्व प्राथमिक विभागातील श्रेया अलगट, त्रिशा बनकर, गीता देशमुख, इयत्ता आठवीतील सरगम निकम या विद्यार्थिनी राजमाता जिजाऊंच्या तर इतर विद्यार्थीही शिवजयंती साजरी करण्यासाठी पारंपारिक वेशभूषेत उपस्थित होते     
 इयत्ता नववीतील प्रद्यूम्न शेवाळे व प्रेरणा मोरे यांनी गारद सादर करत संपूर्ण बनकर पाटील शैक्षणिक संकुल  शिव-गर्जनेने दुमदुमून टाकले तसेच गीता बनकर व श्रावणी देव्हाडराव यांनी मराठी साहित्यातील समाज प्रबोधनाच्या मुख्य साधानांपैकी एक म्हणजे पोवाडा सादर करत अफजलखान वधाचा प्रसंग रंगविला.
पूर्व प्राथमिक विभागातील वेदांश शिंदे, इयत्ता चौथीतील वसुधा अलगट, समृद्धी चव्हाण, रितेश मढवई, गौरव शिंदे,  इयत्ता तिसरीतील सिद्धी शेजवळ, अनुजा वाणी, ऋतुजा बोराळे इयत्ता सातवीतील सोहम हेंबाडे, ऋचा मुंगसे, श्रेयश मोरे  यांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवरायांचा जन्म, त्यांचे कार्य, स्वराज्य स्थापना, युद्धनीती गनिमी कावा, विविध मोहिमा, स्वराज्य नीती अशी शिवचरित्रातील विविध माहिती विद्यार्थ्याना सांगत शिव कार्याला उजाळा दिला. शिक्षिका जयश्री लोंढे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्राचार्य पंकज निकम यांनी व्यासपीठावरून बोलताना मांसाहेब जिजाऊ यांच्या संस्कार शिदोरीच्या जोरावर शिवरायांनी आदर्श  स्वराज्य निर्माण केले. आणि त्यातून प्रजेचे सुराज्य निर्माण केले. सर्वांनी शिवरायांचे चारित्र्य आदर्श मानून समाज, धर्म, देशाचा विकास करावा. व आपले व्यक्तिमत्व आदर्शवत घडवावे असे प्रतिपादन केले.  

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील श्रुतिका बोरणारे व धनश्री रसाळ यांनी केले तर आभार प्रर्दशन क्षितिज बनकर याने केले. यावेळी शाळेचे शिक्षक दीपक देशमुख, पंकज मढवई, विजय मढवई, अनिल कुलधर, रुपाली चव्हाण, शारदा वाघवकर, शुभदा रसाळ , स्मिता भावसार , प्रियांका वैराळ, शीतल महाले, दिपाली जाधव, ममता परदेशी, योगिता शिंदे, पूजा म्हस्के, वैष्णवी पटेल, वृषाली पानगव्हाणे, गायत्री बाकळे, योगेश बोराळे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity