ताज्या घडामोडी :

.

.
Home » » येवल्यातील एन. एन. डी. महाविद्यालयास नॅकचे बी. प्लस मानांकन

येवल्यातील एन. एन. डी. महाविद्यालयास नॅकचे बी. प्लस मानांकन

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, २४ एप्रिल, २०२३ | सोमवार, एप्रिल २४, २०२३

येवल्यातील एन. एन. डी. महाविद्यालयास नॅकचे बी. प्लस मानांकन
यूजीसीच्या बैंगलोर नॅक कमिटीने सोयी-सुविधांचे केले मुल्यांकन 
 
येवला : पुढारी वृत्तसेवा

भौतिक सोयीसुविधा,निसर्गरम्य वातावरण,शिक्षण पद्धती,विद्यार्थी हित जपण्याची तळमळ व अद्ययावत सुविधा अन रेकॉर्ड आदी सुविधांची दखल घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न येथील जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित एस.एन.डी. कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाला नॅकने बी. प्लस मानांकन देऊन महाविद्यालयाच्या कामकाजाचा व प्रगतीचा गौरव केला आहे. 
यूजीसीच्या बैंगलोर नॅक कमिटीने नुकतीच महाविद्यालयास भेट दिली.या कमिटीचे प्रमुख चेअरमन प्रा. विजेंद्रसिंग पुनिया,कॉर्डिनेटर प्रा. आर. पी. सिंग व सदस्य डॉ. अनिल डिंगे यांनी महाविद्यालयातील विविध विभाग, सुसज्ज इमारत, भव्य क्रीडांगण, सुसज्ज ग्रंथालय,अभ्यासिका, प्रयोगशाळा, सेमिनार हॉल, ऑनग्रिड सोलर, रेन हार्वेस्टिंग, मैदान आदि भौतिक, सोयी सुविधांना भेटी दिल्या.महाविद्यालयाचे मूल्यांकन आणि गुणवत्ता - दर्जा निश्चित करण्यासाठी वर्गखोल्यांसह शैक्षणिक गुणवत्तेसाठी उपलब्ध असलेली साधन सामग्री, शिक्षण पद्धती, विविध मॉडेल्स मधील मूल्यांकन मुद्दे आदी विविध निकषांवर समिती पाहणी करून चर्चा केली.त्यानंतर मूल्यांकनासाठीची प्रशासकीय कार्यपद्धती, मूल्यमापनातील घटक, प्राप्त माहितीचे संकलन व पृथकरण करून मूल्यांकनाचा अहवाल तयार करून पहिल्या सायकलमध्येच नॅक समितीने बी. प्लस मानांकन देऊन महाविद्यालयाचा गौरव केला आहे.
अगदी कमी कालावधीत महाविद्यालयाची झालेली प्रगती होत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची प्रगती होत असून अनेक विद्यार्थी पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेऊन व्यवसाय व नोकरीत स्थिरसावर झालेले आहेत.महाविद्यालयाला मिळालेल्या या मानांकनाबद्दल जगदंबा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार नरेंद्र दराडे,आमदार किशोर दराडे,सचिव लक्ष्मण दराडे, संचालक रुपेश दराडे,संस्थेचे समन्वयक सुनिल पवार, समाधान झाल्टे, प्रसाद गुब्बी यांनी अभिनंदन केले.महाविद्यालयाचे मुल्यांकन करण्यासाठी प्राचार्य सुनिल खैरनार,आय.क्यू.सी. कॉर्डिनेटर तुषार बिडगर, बी.बी.ए विभाग प्रमुख प्रा. माधव बनकर, बी.ए. विभाग प्रमुख प्रा. जितेंद्र थोरात, एम. ए. विभाग प्रमुख प्रा. गणपत धनगे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. ललित घाडगे तसेच सर्व प्राध्यापक,कर्मचारी,विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

"गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घेऊन आम्ही महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना उत्तम व चांगले शिक्षण देत आहोत.याचमुळे अध्यापन,भौतिक सुविधासह विविध विद्यार्थी कल्याणकारी योजना,व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम ,विविध नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे  नॅक समितीने बी. प्लस मानांकन देऊन आमच्या कामाचा सन्मान केला आहे."
-रुपेश दराडे,कार्यकारी संचालक,जगदंबा शिक्षण संस्था,येवला 
फोटो
येवला : एस.एन.डी. कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या भेटीप्रसंगी नॅक समिती सदस्य व प्राध्यापक.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity