ताज्या घडामोडी :

.

.
Home » » देव देश आणि धर्मासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवा! हिंदूंनी एकत्रित या--- बाबासाहेब डमाळे पाटील

देव देश आणि धर्मासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवा! हिंदूंनी एकत्रित या--- बाबासाहेब डमाळे पाटील

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, १८ जून, २०२३ | रविवार, जून १८, २०२३देव  देश आणि धर्मासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवा! हिंदूंनी एकत्रित या--- बाबासाहेब डमाळे पाटील

येवला : पुढारी वृत्तसेवा

देव,देश, आणि धर्माच्या रक्षणासाठी, हिंदू धर्माचे संस्कार जतन ठेवण्यासाठी, राजे महाराजांचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी समाजातील सर्वच जाती- पोट जातीतील समाज,साधुसंत व विचारवंतांनी सर्वांनी एकत्र येऊन हिंदू धर्माच्या विरोधात चालू असलेला षडयंत्र विरोधात भक्कम लढा उभा केला पाहिजेत असे प्रतिपादन बाबासाहेब डमाळे पाटील यांनी केले.
           छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करून राज्याभिषेक करून घेतला या काळास  ३५० वर्षे पूर्ण झालेले आहेत. विविध संघटनांनी, शासनाने वर्षभरात अनेक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. बाबासाहेब डमाळे पाटील मित्र मंडळाच्या वतीनेही येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघात "हिंदू साम्राज्य" दिन म्हणून विविध कार्यक्रमआयोजित केलेले आहे.यानिमित्ताने ठिकठिकाणी डमाळे पाटील गावोगाव जाऊन हिंदू जनजागृती व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे बीज लोकांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत डमाळे पाटील पुढे म्हणतात की लव जिहाद,धर्मांतर वशीकरण आदी माध्यमातून हिंदू तरुणींना फसवण्याचे व हिंदू समाजाला बाटविण्यासाठी मोठे षडयंत्र चालू असून राजकीय नेते याबाबतीकडे गांभीर्याने घेत नाहीत. मतांच्या जोगव्यासाठी ते लाचार आहेत.मात्र समाज जागृती,हिंदूंचे संस्कार,हिंदूं समाजाच्या चालीरीती काही परकीय (परदेशी) लोक स्वतःहून स्वीकारतात मात्र आपल्या देशातीलच काही लोक हिंदूंचे संस्कार, संस्कृती,चाली-रीती, छत्रपती शिवाजी महाराजां बरोबरच इतर राजे महाराजांचा इतिहास संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करतआहेत.आपले हिंदू धर्मांचे सर्व साधू संत- महंत व विचारी-आचारी लोक याकरिता प्रयत्न करतात त्यांना जनतेने साथ दिली पाहिजे असे डमाळे पाटील आपल्या भाषणातून सांगून गावागावात जाऊन साधू- संतांचा सन्मान करत आहे. या उपक्रमाला तालुक्यातून चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे .
          ज्येष्ठ पत्रकार व अनुलोम संस्थेचे स्वानंद ओक लिखित राज्याभिषेकाचा पराक्रम ही पुस्तिका ठीकठिकाणी वाटली जात आहे. गावागावात हिंदू संत व तरुण, वयोवृद्ध,वारकरी व सर्व पंथांचे भक्तजन मोठ्या संख्येने गर्दी करतआहे. आपले मनोगतही व्यक्त करत आहे.
       विविध पक्षांचे ज्येष्ठ पुढारी, समाजातील ज्येष्ठ नागरिकांबरोबरच ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ.प. रामराव महाराज ढोक, भास्करगिरी महाराज, गोपाला नंदगिरी महाराज, आसाराम महाराज, शिवगिरी महाराज, दिपक महाराज ढोकळे, बालेश्वर महाराज, गोरखनाथ महाराज, रामेश्वर महाराज, श्रावण महाराज, महेंद्र महाराज, शिवेश्वर गिरी महाराज, उत्तम बाबा मढवई महाराज  रामकृष्ण महाराज, निलेश महाराज, युवराज महाराज,दिगंबर महाराज यांच्यासह अनेक साधुसंतांचा सन्मान करून डमाळे पाटील यांनी देव, देश,आणि धर्माच्या रक्षणाकरिता हिंदूंचे संस्कार व इतिहास जोपासण्याकरिता साधुसंतांना साथ देऊन जनतेने पुढाकार घ्यायला हवा अशा प्रकारची विनंती केली जात आहे.या प्रतिसादात संत,महंत ही सांगतात की समाजाने ही जागृत राहावे आम्ही देव, देश,धर्माच्या रक्षण व संस्कार टिकवण्या करिता  अहोरात्र प्रयत्न करतच आहोत.जनतेने मात्र भरकटू नये असेही महाराज मंडळीं सांगतआहे. येवला-लासलगाव परिसरातील बहुतेक गावे डमाळे पाटील यांनी पिंजून काढले असून त्यांचा उर्वरित गावात प्रवास चालू आहे. माझा हा प्रवास शेवटपर्यंत चालू असेल असे शेवटी बाबासाहेब डमाळे पाटील म्हणाले.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity