ताज्या घडामोडी :

.

.
Home » » बँक ऑफ बडोदा व्यवस्थापक नसल्याने शेतकऱ्यांचा कर्जपुरवठा थांबला व्यवस्थापक नियुक्तीची मागणी

बँक ऑफ बडोदा व्यवस्थापक नसल्याने शेतकऱ्यांचा कर्जपुरवठा थांबला व्यवस्थापक नियुक्तीची मागणी

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, २४ जून, २०२३ | शनिवार, जून २४, २०२३



बँक ऑफ बडोदा व्यवस्थापक नसल्याने शेतकऱ्यांचा कर्जपुरवठा थांबला
व्यवस्थापक नियुक्तीची मागणी

येवला : पुढारी वृत्तसेवा

नियमित आसमानी आणि सुलतानी संकटांना तोंड देणाऱ्या बळीराजाला खरीप हंगामामध्ये बँक ऑफ बडोद्याच्या गैरव्यवस्थापनामुळे आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. 
येवला तालुक्यातील पाटोदा येथे बॅंक ऑफ बडोदाची शाखा असून येथील शाखा व्यवस्थापकांची सुमारे एक महिन्यांपूर्वी बदली झाली असून त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर नवीन शाखा व्यवस्थापकांची नियुक्ती न झाल्याने हजारो खातेधारकांची हाल सुरू आहे. शेतकऱ्यांना ही बँक म्हणजे असून अडचण नसुन खोळंबा झाला असल्याची तक्रार शेतकऱ्यासह खातेधारकांनी केली आहे.  बँक ऑफ बडोदाच्या निकृष्ट सेवेमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे येथील बँक शाखा व्यवस्थाकपदी लवकरात लवकर नियुक्ती करुन शेतकऱ्यांना होणारा कर्जपुरवठा तात्काळ सुरू करण्यात यावा तसेच खातेदार ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यात यावी  अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सध्या खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे कांदा कवडीमोल दरात विक्री होत असल्याने शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत आला आहे खरीप हंगामासाठी खेळत्या भांडवलाची गरज असून शेतकरी कर्जासाठी बँकेच्या दारात चकरा मारत आहे मात्र आज साहेब नाही उद्या या असे उत्तर ऐकून घराचा रस्ता धरण्यापलीकडे शेतकऱ्यांकडे कोणताही पर्याय उरलेला नाही शेतकऱ्यांना कर्ज एन देणाऱ्या बँकावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत पाटोदा येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत व्यवस्थापकच नसल्याने शेतकऱ्यांना होणारा कर्जपुरवठा पूर्णपणे थांबला आहे पाटोदा परिसरातील सुमारे १८ ते २० गावे मिळून एकच बँक असल्याने शेतकऱ्यांची सर्व मदार या बँकेवरच अवलंबून आहे परिसरातील सर्व गावे बँक ऑफ बडोदाला दत्तक दिले असून दुसरी कोणतीही बँक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करत नाही त्यामुळे नाईलाजाने का होईना शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ येत आहे शेतकऱ्यासह हजारो खातेधारकांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी पाटोदा,कातरणी, विखरणी,आडगाव रेपाळ,मुरमी,कानडी,गुजरखेडे,ठाणगाव,पिंपळगाव लेप,पिंपरी,विसापूर,सोमठानदेश यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity