ताज्या घडामोडी :

.

.
Home » » येवल्यात मुस्लिमांच्या वतीने मूक मोर्चा

येवल्यात मुस्लिमांच्या वतीने मूक मोर्चा

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, २१ ऑगस्ट, २०२३ | सोमवार, ऑगस्ट २१, २०२३


येवल्यात मुस्लिमांच्या वतीने मूक मोर्चा

येवला : पुढारी वृत्तसेवा

दिनांक 10 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे अज्ञात समाजकंटकांनी मशिदीमध्ये अनधिकृत रित्या प्रवेश करून पवित्र धर्मग्रंथ कुराण फाडून त्याची विटंबना केली आहे आणि आज रोजी अकरा दिवस होऊन देखील संबंधित प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही या घटनेच्या निषेधार्थ व सदर घटनेमागे असलेल्या धर्माध समाजकंटकाला त्वरित अटक करून कडक शासन करावे या मागणीसाठी येवले शहरातील अजहर शहा मोफीज अत्तार, जावेद लखपती, बिलाल शेख सह सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी माजी नगराध्यक्ष हुसेन शेख माजी उपनगराध्यक्ष मतीन अंसारी, अजिज भाई शेख, मोबीन अन्सारी, हाजी मोहसीन दादा फिटर, अमजद शेख, एजाज मेंबर ,मुस्तकिम बाबा , सद्दाम भाई शेख, अन्सार शेख, शेरू भाई मोमीन, इलियास पहिलवान,वकील मेंबर, रिजवान मेंबर ,अफजल मौलाना आदी उपस्थित होते सदर मूक मोर्चाचे नेतृत्व सर्व मशिदीचे इमाम यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले होते व लक्कडकोट मशिदीचे इमाम इनामुल्लाह साहब, बडी तकिया मशीदचे इमाम हाफिज सलमान सहाब यांच्या हस्ते शहर पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार कदम साहेब नायब तहसीलदार पंकजा मगर मॅडम यांना निवेदन सादर करण्यात आले
 कुराण शांतीचा सद्भावनेचा एकात्मतेचा संदेश देणारा पवित्र धर्मग्रंथ असून मुस्लिम समाजाचे पवित्र धर्मग्रंथ आहे आणि ज्या अधर्मी व्यक्तीने त्याची विटंबना केली त्याने संपूर्ण मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्याचा व जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे अशा व्यक्ती वरती कठोर ते कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यात जो कोणी हि असे कृत्य करण्याआधी एकदा विचार नक्की करेल असे मनोगत हाफिज सलमान यांनी केले हाफिज इनामुल्लाहा यांनी उपस्थित सर्वांना कुराण ची शिकवण व संदेश अरबी भाषेत सांगून त्याचे हिंदीत भाषांतर केले सर्वांनी श्रद्धा व सबुरीने सदर प्रकरणी आपली भूमिका घ्यावी आणि कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी आपल्याला कुराणने जो मार्ग दाखवला आहे त्याचे आचरण करून झालेल्या घटनेच्या निषेधार्थ शांतीच्या मार्गाने प्रशासनाला विनंती विनंती आहे का त्यांनी त्वरित कारवाई करावी व संबंधित समाजकंटकाला अटक करावी असे मनोगत त्यांनी व्यक्त केले येवला शहर पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार कदम साहेब यांनी आपल्या मनोगतात सर्व मुस्लिम बांधवांचे व आयोजकांचे अभिनंदन केले तसेच सदर मोर्चा अतिशय शांतता प्रिय मार्गाने आपण आयोजित केला मी आपण केलेल्या निषेध मोर्चाचा पत्रव्यवहार आमच्या वरिष्ठांशी लवकरच करेल आणि संबंधित समाजकंटकावर कठोर ते कठोर कारवाई करून योग्य तो शासन दिला जाईल असे आश्वासन देतो असे मनोगत त्यांनी 
व्यक्त केले सूत्रसंचालन अजहर शहा  यांनी केले  मोर्चाच्या यशस्वीतेसाठी मुजम्मिल शेख ,सोहेल शेख,वसीम शेख, यासीन शेख, अत्तू शेख, मुसैफ बेग, अबरार अत्तार, कफिल पिंजारी, मुद्दसिर शेख, रिजवान अन्सारी, अजहर मुख्तार, अमान शेख, राईस शेख, अरमान पठाण, मजीद शेख , आदींनी परिश्रम घेतले
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity