ताज्या घडामोडी :

.

.
Home » » ट्रायथलॉन वर्ल्डकप २०२३‎ स्पर्धेमध्ये येवल्याच्या कृष्णा तनपुरेची चमकदार कामगिरी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून खेळाडू कृष्णा तनपुरेचा सन्मान

ट्रायथलॉन वर्ल्डकप २०२३‎ स्पर्धेमध्ये येवल्याच्या कृष्णा तनपुरेची चमकदार कामगिरी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून खेळाडू कृष्णा तनपुरेचा सन्मान

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३ | सोमवार, ऑगस्ट ०७, २०२३



ट्रायथलॉन वर्ल्डकप २०२३‎ स्पर्धेमध्ये येवल्याच्या कृष्णा तनपुरेची चमकदार कामगिरी

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून खेळाडू कृष्णा तनपुरेचा सन्मान

येवला  : पुढारी वृत्तसेवा

अबुधाबी दुबई येथे नुकत्याच‎ झालेल्या ट्रायथलॉन वर्ल्डकप २०२३‎ स्पर्धेमध्ये येवला तालुक्यातील कृष्णा बाबासाहेब तनपुरे या खेळाडूने चमकदार कामगिरी‎ करून कास्यपदक मिळविले. तर जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले. या दोन्हीही स्पर्धांमध्ये पदक मिळविणारा तो‎ भारताचा एकमेव खेळाडू ठरला आहे. आज राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथील कार्यालयात त्याचा यथोचित सन्मान केला. यावेळी कृष्णा तनपुरे यास भावी वाटचालीस शुभेच्छा देत शासकीय मदत व नोकरीसाठी प्रयत्न करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.


येवला तालुक्यातील आडगाव रेपाळ येथील रहिवासी कृष्णा बाबासाहेब तनपुरे या खेळाडूने पॅरा ट्रायथलॉन स्पर्धेत देशासाठी पाचवेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले तर दोन वेळा नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये यश मिळवीत देशाचे प्रतिनिधित्व केले. नुकत्यात अबुधाबी दुबई येथे ‎झालेल्या ट्रायथलॉन वर्ल्डकप २०२३‎ स्पर्धेमध्ये त्याने चमकदार कामगिरी‎ करून कास्यपदक तर जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. या दोन्हीही स्पर्धांमध्ये पदक मिळविणारा तो‎ भारताचा एकमेव खेळाडू ठरला आहे. तसेच चैन्नई येथे झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये त्याने सुवर्णपदक मिळविले आहे.


तुर्कस्तान येथे सन २०२२ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत सहभाग नोंदविला. तर उजबेकिस्तान येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. तसेच डिसेंबर २०२३ मध्ये युरोप येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये तो सहभागी होणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल मंत्री छगन भुजबळ यांनी त्याचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity