ताज्या घडामोडी :

.

.
Home » » सचखंड,नंदीग्राम,देवगिरीसह तपोवन‌ एक्सप्रेसला नगरसूल स्थानकावर थांबा द्या! माजी सरपंच पाटील,ग्रामस्थांसह येवल्यातील व्यापाऱ्यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

सचखंड,नंदीग्राम,देवगिरीसह तपोवन‌ एक्सप्रेसला नगरसूल स्थानकावर थांबा द्या! माजी सरपंच पाटील,ग्रामस्थांसह येवल्यातील व्यापाऱ्यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, ८ ऑगस्ट, २०२३ | मंगळवार, ऑगस्ट ०८, २०२३

सचखंड,नंदीग्राम,देवगिरीसह तपोवन‌ एक्सप्रेसला नगरसूल स्थानकावर थांबा द्या!
माजी सरपंच पाटील,ग्रामस्थांसह येवल्यातील व्यापाऱ्यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी 


येवला  : ‌पुढारी  वृतसेवा 
शहर व तालुका पैठणी,कांदा,टोपी आदींची मोठी बाजारपेठ आहे.येथून राज्यसह परराज्यात जाणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्याही मोठी आहे.शिवाय शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांना येण्यासाठी देखील नगरसुल हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे.त्यामुळे येथे सचखंड,नंदिग्राम,देवगिरी, तपोवन,राजाराणी,जनशताब्दी ह्या एक्सप्रेस गाड्यांना नगरसूल रेल्वे स्थानकावर थांबा द्यावा अशी मागणी माजी सरपंच,ग्रामस्थ,सामाजिक कार्यकर्त्यासह येथील जैन‌ संघटनेसह व्यापारी बांधवांनी केली आहे. रेल्वे प्रशासनासह केंद्र व राज्यातील मंत्र्यांकडे देखील ही मागणी करण्यात आली आहे.


नगरसूल येथील माजी सरपंच प्रमोद पाटील,सामाजिक कार्यकर्ते सुरज राजपूत,विनोद पाटील, डॉ.वाल्मिक बोडके,शौकत शेख आदींनी नांदेड विभागाच्या रिजनल मनेजर श्रीमती नीती सरकार यांना या मागणीचे निवेदन दिले आहे. अमृत भारत स्थानक सुधारणा योजनेमध्ये नगरसूल रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला असून या रेल्वे स्थानकात विविध विकासकामे करण्यात येणार आहे. आभासी पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आले.त्याप्रश्वभूमिवर या मागणीला महत्व आले आहे.नगरसुल‌ रेल्वे‌ स्टेशन‌वरून प्रवास‌ करणार्या‌ प्रवाशांची‌ संख्या दिवसेदिवस‌ वाढत‌ आहे‌ नगरसुल‌ या‌ ठिकाणापासुन‌ येवला‌ शहर‌ फक्त‌ १० कि.मी‌ अंतरावर ‌असुन‌ येवला‌ येथे‌ पारंपरिक ‌पैठणी‌ खरेदी‌ करणेसाठी‌ बाहेरगावाहून ‌अनेक‌ पर्यटक‌ येत‌ असतात‌ तसेच‌ येवला‌ येथुन‌ सदरचे‌ पर्यटक‌ हे‌ शिर्डी ‌येथे‌ साईबाबा‌ शानिशिंगणापुर‌ तसेच‌ कोटमगांव‌ (देवीचे) या‌ ठिकाणी‌ दर्शनासाठी ‌ येत‌ असतात‌.येथे‌ भव्य कांद्याची बाजार समिती व‌ डॉ.बाबासाहेब आंबेडकर ‌यांची‌ चैत्यभुमी‌ या‌ ठिकाणी‌ असल्याने‌ देशभरातुन‌ नागरिक ‌याठिकाणी‌ येत‌ असतात‌.त्यामुळे‌ नगरसुल‌ रेल्वे‌ स्टेशन हे‌ अत्यंत महत्वपूर्ण आहे‌.हे महत्व व प्रवाशाची गैरसोय लक्षात घेऊन नगरसुल‌ रेल्वे‌ स्टेशन येथे सचखंड,नंदीग्राम,राजाराणी‌, देवगिरी,तपोवन,जनशताब्दी एक्सप्रेस ‌या‌ गाड्याना‌ थाबा‌ मिळावा‌.त्यामुळे‌ अनेक‌ प्रवासी‌ ज्यांना‌ मनमाड,कोपरगांव ‌येथे‌ थांबा‌ घ्यावा‌ लागतो‌ ते‌ नगरसुल‌ येथे‌ उतरु‌ शकतात‌.प्रवासी‌ तसेच‌ व्यापारी‌ यांना‌ दळणवळणासाठी‌ योग्य‌ सोय‌ होणार असल्याने या गाड्यांना थांबा मिळावा असे‌ ग्रामस्थ प्रवाशी संघ तसेच जैन संघटनेच्या निवेदननात म्हटले आहे.
येवला,कोपरगाव तालुक्यातील व्यापारी हितासाठी या एक्सप्रेसला नगरसूलला येथे थांबा द्यावा असे  
भारतीय जैन‌ संघटनेच्या‌ वतीने‌ देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.अन्न‌ व‌ पुरवठा‌ मंत्री‌‌ छगन‌ भुजबळ‌ तसेच‌ रेल्वे‌ मंत्री‌ आश्विनी‌ वैष्णव,रेल्वे‌ राज्यमंत्री रावसाहेब‌ दानवे‌,आरोग्य ‌राज्यमंत्री‌ भारती पवार‌ नगरसुल‌ रेल्वे‌ स्टेशन प्रमुख गौतम‌ आहेर,नांदेड रेल्वे‌ समिती सदस्य ‌समिर‌ समदडिया ‌यांना‌ निवेदन पाठविण्यात‌ आले आहे. याप्रसंगी‌ भारतीय जैन‌ संघटनेचे‌ अध्यक्ष रोशन‌ भंडारी,‌कार्याध्यक्ष गौतम‌ मडलेचा‌,उपाध्यक्ष विशाल चंडालिया,सह‌‌सेक्रेटरी अकुश‌ ललवाणी,खजिनदार‌ रविन्द्र बाफणा‌, सदस्य‌ डॉ.राजीव‌ चंडालिया,गौतम‌ बाफणा‌,सचिन‌ समदडिया,जितेश‌ जैन‌,कांतिलाल गादिया‌ आदिसह‌ उपस्थित होते.
 
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity