ताज्या घडामोडी :

.

.
Home » » सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी येवला शहर व तालुका बंद

सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी येवला शहर व तालुका बंद

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, १३ सप्टेंबर, २०२३ | बुधवार, सप्टेंबर १३, २०२३




सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी येवला शहर व तालुका बंद 
येवला : पुढारी वृत्तसेवा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, मागण्यांसाठी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी येवला शहर व तालुका बंद पुकारला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीची दखल घेतली जात नसल्याने येथील सकल मराठा समाजही आता सक्रिय होऊ लागला आहे. येथील मराठा युवा समाज बांधवांनी आज प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, नायब तहसीलदार पंकज मगर, तसेच पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन हा इशारा दिला आहे. 

यावेळी तहसील कार्यालयात काही वेळ ठिय्या देत घोषणाबाजी करण्यात आली. समाज शांततेच्या मार्गाने आपला हक्क मागत असतानाही शासन दुर्लक्ष करत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.  शांततेच्या मार्गानेच येथे आंदोलन केले जाईल, असेही यावेळी संजय सोमासे यांनी सांगितले.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात मुंबई येथील अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम पूर्ण करण्यात यावे, राजापुर येथील राजे शिवछत्रपती शिवरायांचा बंदीस्त असलेला पुतळा माना-सन्मानाने पुन्हा त्याच ठिकाणी स्थापित बसविण्यात यावा,  महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला कुणबी घोषीत करण्यात यावे, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जे मराठा समाजावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे, त्याचे चार्जशीट दाखल करण्यात येऊ नये, सन १९७२ पासुन ते आज पर्यंत पूर्ण न झालेल्या येवला तालुक्यातील पुणेगांव-दरसवाडी-डोंगरगांव पोहच कालव्याचे काम २०२३ अखेर पर्यंत पुर्ण करण्यात यावे,  येवला तालुक्यातील चिचोंडी येथे होऊ घातलेल्या एमआयडीसीच्या राहिलेल्या पायाभूत सुविधांचे काम त्वरित पूर्ण करून नविन कंपन्या त्वरीत आणाव्यात, येवला औद्योगिक वसाहतीला अधिक जमीन संपादन करून देण्यात यावी, पालखेड डावा कालवा बारमाही पाण्यास मंजुरी देण्यात यावी व कमीतकमी शेतीसाठी ५ ते ६ आवर्तने चारी क्र. ५२ पर्यंत आरक्षित करण्यात यावी, व त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, येवला शहरात २००५ पासुन मागणी करण्यात आलेली राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे शिवसृष्टीचे काम १९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पुर्ण करण्यात यावे, अंगणगांव येथील येवला पैठणी पर्यटन केंद्रा जवळील बंद असलेले पैठणी क्लस्टर त्वरीत चालु करण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर संजय सोमासे, निंबाजी फरताळे, प्रशांत आरखडे, चंद्रमोहन मोरे, गणेश सोमासे, प्रफुल गायकवाड, रामनाथ ढोमसे, गोरख संत, गोरख कोटमे, नितीन जाधव, योगेश शिरगुळे, राजेंद्र लभडे, नितीन खैरणार, चंद्रमान बोळीज, अर्जुन बोळीज आदींच्या सह्या आहेत.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity