ताज्या घडामोडी :

.

.
Home » » बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये दसरा पूजन ..... बालगोपाळांचा रंगला दांडिया

बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये दसरा पूजन ..... बालगोपाळांचा रंगला दांडिया

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०२३ | मंगळवार, ऑक्टोबर २४, २०२३


बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये दसरा पूजन ..... बालगोपाळांचा रंगला दांडिया


येवला : पुढारी वृत्तसेवा
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांचा सांस्कृतिक विकासही व्हावा हा उद्देश समोर ठेऊन अंगणगाव येथील बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये दसरा सण साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बनकर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सरस्वतीमातेच्या प्रतिमेसह शाळेतील वह्या व पुस्तके यासह इतर शैक्षणिक साहित्याचे पुष्पहार अर्पण करत पूजन करण्यात आले. प्राचार्य पंकज निकम यांनी यावेळी सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. पारंपारिक वेशभूषेतील बालगोपाळांचा दांडिया ठरला विशेष आकर्षण.
कार्यक्रमात शिक्षिका वृषाली पानगव्हाणे यांनी दसरा सण साजरा करण्यामागील विविध परंपरा, दसरा सणातील आपट्याच्या पानांचे महत्व, दसरा सणाचे शेतीच्या माध्यमातून ग्रामीण भागात असलेले महत्व, दसऱ्याचे भारताच्या विविध राज्यातील स्वरूप अशी दसऱ्याविषयी सर्वांगीण माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच प्रतिकात्मक रावण दहन करणे म्हणजे वाईट विचारांचा, सवयींचा, व्यसनांचा  त्याग करणे असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. सदर कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी गरबा- दांडिया नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत शाळेत येत गरबा नृत्य सादर करत यथेच्छ  आनंद लुटला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली जाधव, वृषाली पानगव्हाणे तर आभारप्रदर्शन प्रियंका वैराळ यांनी केले. यावेळी नेहा सोनार, शुभांगी पटेल, सुवर्णा आहिरे, ममता परदेशी,पंकज मढवई, स्मिता भावसार, विकास मोरे, शुभदा रसाळ, प्रियंका कासले,जयश्री लोंढे, वंदना वाकचौरे, उज्वला माळवदे, योगेश बोराळे, सागर झांबरे, मृगया गुजराथी, योगिता शिंदे, वैष्णवी पटेल, शीतल कोळस आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
दसरा पूजन प्रसंगी शिक्षक वृंद
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity