ताज्या घडामोडी :

.

.
Home » » येवला प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी एकनाथ घुले यांची निवड उपाध्यक्षपदी शंकर निकम यांची बिनविरोध निवड

येवला प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी एकनाथ घुले यांची निवड उपाध्यक्षपदी शंकर निकम यांची बिनविरोध निवड

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३ | बुधवार, नोव्हेंबर ०१, २०२३




येवला प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी एकनाथ घुले यांची निवड
उपाध्यक्षपदी शंकर निकम यांची बिनविरोध निवड  

येवला : पुढारी वृत्तसेवा

येथील अग्रगण्य स्व. शशिकांत ठोंबरे येवला तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शिक्षक नेते एकनाथ घुले यांची तर उपाध्यक्षपदी शंकर निकम यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.सर्वानुमते या दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
प्राथमिक शिक्षकांची हि तालुक्यातील अग्रगण्य व प्रगतशील पतसंस्था असून ५५० वर सुभासद आहेत.मागील वर्षी संस्थेची निवडणूक चुरशीच्या वातावरणात पार पडली होती.यावेळी शिक्षक संघाची निर्विवाद सत्ता आली होती.शिक्षक नेते बाजीराव सोनवणे यांची त्यावेळी अध्यक्षपदी वर्णी लागली होती.त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नुकताच राजीनामा दिला होता.यामुळे नव्याने अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया आज पार पडली.यामध्ये सर्व संचालक मंडळाने बैठक घेऊन सर्वानुमते अध्यक्षपदी एकनाथ घुले व उपाध्यपदी शंकर निकम यांच्या नावावर सहमती झाली.
विहित मुदतीत या दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड प्रक्रिया पार पडली.यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निंबधक श्री.कासार यांनी कामकाज पाहिले.यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाजीराव सोनवणे,जिल्हानेते नारायण डोखे,शिक्षक नेते संजय दराडे,संघाचे तालुकाध्यक्ष शांताराम काकड,शिक्षक भारतीचे संदीप शेजवळ,सरचिटणीस दिनेश मानकर, नवनाथ कांगणे,किरण जाधव,गोकुळदास वाघ,विजय परदेशी,राजेंद्र कोतकर,मनिषा गांगुर्डे,जयश्री राठोड, शीतल निमसे,पतपढीचे दत्तात्रय भोरकडे तसेच सर्व संचालक मंडळ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.या निवडीबद्दल आमदार नरेंद्र दराडे,शिक्षक आमदार किशोर दराडे,युवा नेते संभाजीराजे पवार आदींनी नवनियुक्त अध्यक्ष-उपाध्यक्षाचे अभिनंदन केले.
तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची हि अग्रगण्य पतसंस्था असून शिक्षकांच्या योगदानामुळे प्रगतीपथावर आहे.सर्वांच्या सोबतीने यापुढेही संस्थेला प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी आम्ही एकोप्याने काम करू अशी प्रतिक्रिया निवडीनंतर अध्यक्ष घुले व उपाध्यक्ष निकम यांनी व्यक्त केली.
फोटो
येवला : प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी एकनाथ घुले व उपाध्यक्षपदी शंकर निकम यांची बिनविरोध निवड झाल्यावर सत्कार करताना शिक्षक नेते बाजीराव सोनवणे आदी.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity