ताज्या घडामोडी :

.

.
Home » » येवला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत छगन भुजबळ यांचेच वर्चस्व कायम

येवला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत छगन भुजबळ यांचेच वर्चस्व कायम

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ६ नोव्हेंबर, २०२३ | सोमवार, नोव्हेंबर ०६, २०२३येवला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत छगन भुजबळ यांचेच वर्चस्व कायम

शिरसगाव लौकी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे विजयी

येवला : पुढारी वृत्तसेवा
 येवला विधानसभा मतदारसंघात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचेच वर्चस्व कायम असल्याचे बघायला मिळत आहे. येवला तालुक्यात झालेल्या शिरसगाव लौकी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, लौकि शिरस ग्रामपंचायत सरपंचपदी प्रदीप कानडे तर खैरगव्हान ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत समाधान सावंत देविदास पिंगट विजयी झाले आहे.


आज मंत्री छगन भुजबळ येवला येथील संपर्क कार्यालयात सर्व विजयी उमेदवारांचा स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांच्याकडून सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


शिरसगाव लौकि ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी ज्ञानेश्वर रामदास शेवाळे, सदस्यपदी डॉ. प्रवीण गोरख बुल्हे, सतिश भिमाजी पाटील, सरला बाळू बुल्हे, प्रियंका गोरख मुळे, माधुरी दत्तू वाकचौरे, संगीता विष्णू गवळी विजयी झाल्या. तर लौकी शिरस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रदीप कानडे, सदस्यपदी सोमनाथ दगु कानडे, सुमनबाई सुखदेव अडांगळे, बापू जगन्नाथ आढाव, प्रतिभा दत्तू शिल्लक तसेच
खैरगव्हान ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत समाधान रामदास सावंत, देविदास निवृत्ति पिंगट विजयी झाले. या सर्व विजयी उमेदवारांचे मंत्री छगन भुजबळ यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity