येवला उर्फ येवले हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील तालुक्याचे गाव आहे. येथे नगरपालिका असुन तीची स्थापना इ.स 1853 साली झालेली आहे. मनमाडच्या दक्षिणेस 29 किमी तसेच शिर्डी पासून उत्तरेकडे ३३ किमी अंतरावर नगर-मनमाड व नाशिक औरंगाबाद महामार्गच्या चौफुलीवर वसलेले आहे. जागतिक नकाशात अक्षांश 20.03 व रेखांश 74.43. या वर आहे. तसेच समुद्र सपाटीवरुन 560 मी उंचीवर आहे.
येवला तालुक्यात अंजीठा पर्वत रांगातील डोंगरे असुन अनकाई व टनकाई किल्ले आहेत.